इस्लामपूर-महादेवनगर येथे महाडिक युवा शक्तीच्यावतीने झाडांचे वाटप करण्यात आले. यावेळी उषा पंडित-मोरे, सुजित थोरात, आश्विनी पाटील, माई जाधव उपस्थित होत्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : येथील महादेवनगर येथे महाडिक युवशक्तीचे सुजित थोरात व महादेवनगर मित्र परिवाराच्या वतीने झाडे वाटप करण्यात आली. येथील समाजसेविका उषा पंडित-मोरे यांच्याहस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
त्या म्हणाल्या की, ग्रीन महादेवनगर एक चांगली संकल्पना महादेवनगर मित्र परिवार राबवत आहे. हा उपक्रम स्तुत्य आहे. असे नवनवीन उपक्रम राबवत असताना समाजाने हे उपक्रम म्हणजे सुरुवात आहे हे समजून ते स्वत:हून पुढे न्यायला हवेत. त्यासाठी लागणारे सहकार्य आम्ही सामाजिक व राजकीय मंडळी नक्की देऊ.
यावेळी कार्यक्रमाला अनेक प्रमुख मान्यवरांनी उपस्थिती लावून शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे विशेष असे की, ज्या प्रत्येक महिलेला एक असे जवळपास तीनशे झाडे वाटप करण्यात आली.
संयोजन सुजित थोरात, धीरज कबुरे, प्रथमेश निकम, सागर लाखे, महेश झेंडे, अखिलेश शिंदे, संकेत भंडारी, मयूरेश शेजाळे, प्रथमेश पवार, अमोल शिंदे, वैभव देसाई, विशाल पाटील, ऋषिकेश पाटणकर यांनी केले.