कॉम्प्युटर जिनिअस स्पर्धेत साहील, मधुरा, आशा प्रथम

By Admin | Updated: January 20, 2015 23:36 IST2015-01-20T22:55:27+5:302015-01-20T23:36:45+5:30

बालमंचचा उपक्रम : माहितीचा खजाना

COMPUTER GEINES COMPETITION SAIL, MIDURA, ASHA FIRST | कॉम्प्युटर जिनिअस स्पर्धेत साहील, मधुरा, आशा प्रथम

कॉम्प्युटर जिनिअस स्पर्धेत साहील, मधुरा, आशा प्रथम

इस्लामपूर : ‘लोकमत’ बाल विकास मंचतर्फे आयोजित व सॉफ्टेक कॉम्प्युटरच्या सहकार्याने बाल विकास मंच सदस्यांसाठी राबविण्यात आलेल्या संगणक प्रशिक्षणानंतर घेण्यात आलेल्या ‘कॉम्प्युटर जिनिअस’ स्पर्धेत लहान गटातून साहील चोपडे (प्रकाश पब्लिक स्कूल), मधुरा जाधव (डॉ. व्ही. एस. नेर्लेकर विद्यालय), तर मोठ्या गटात आशा अहिर (इस्लामपूर हायस्कूल), प्रणव माळी (आदर्श बालक मंदिर) हे प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले.बाल विकास मंचच्या सदस्यांसाठी सॉफ्टेक कॉम्प्युटर्सतर्फे १ आॅगस्ट १४ ते १५ जानेवारीपर्यंत मोफत संगणक प्रशिक्षण देण्यात आले. त्यानंतर या सर्वांसाठी डिजटिल फ्रेंड ही कार्यशाळा घेण्यात आली. यामध्ये महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जीवनचरित्रावर आधारित वीरपुरुष प्रश्नमंजुषा, बालदिनानिमित्त फनीगेम्स, गाणी, गप्पा-गोष्टी, अवकाश वेध सफर, प्राणी-पक्षी वाचवाचा स्लाईड शो, इंटरनेट सर्फिंग, चंदामामा डॉट कॉम, पंचतंत्र गोष्टी अशा अनेकविध माहितीचा खजाना बाल मंच सदस्यांना मिळाला.
कार्यशाळेच्या शेवटी कॉम्प्युटर जिनिअस ही बुद्धिमापनाची परीक्षा घेण्यात आली. ‘सॉफ्टेक’च्या संगीता शहा, भूषण शहा यांनी स्पर्धेचे संयोजन केले. (वार्ताहर)

Web Title: COMPUTER GEINES COMPETITION SAIL, MIDURA, ASHA FIRST

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.