कुंभारी ते सिंगनहळ्ळी रस्त्यालगत खोदाईबाबत तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:24 IST2021-03-06T04:24:53+5:302021-03-06T04:24:53+5:30
जत : तालुक्यातील कुंभारी ते सिंगनहळ्ळी व कुंभारी ते काशीलिंगवाडी या दोन रस्त्यांलगत अवैध खोदाई सुरू आहे. त्यामुळे अपघाताचा ...

कुंभारी ते सिंगनहळ्ळी रस्त्यालगत खोदाईबाबत तक्रार
जत : तालुक्यातील कुंभारी ते सिंगनहळ्ळी व कुंभारी ते काशीलिंगवाडी या दोन रस्त्यांलगत अवैध खोदाई सुरू आहे. त्यामुळे अपघाताचा धोका व शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. हे काम त्वरित बंद करावे, अशी मागणी पंचायत समिती सदस्या अर्चना पाटील व जिल्हा परिषद सदस्य सरदार पाटील यांनी केली आहे.
जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, रस्त्यालगत असलेल्या गटारीपासून दहा फूट अंतरावर खोदाई करणे आवश्यक असताना रस्त्याच्या लगतच साइडपट्टीलगत खोदाई होत आहे. त्यामुळे रस्ता खराब होत आहे. यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा परिषद बांधकाम विभाग यांच्याकडे संपर्क साधला असता तेथील अधिकारी आपली जबाबदारी झटकून टोलवाटोलवी करत आहेत. त्यामुळे या कामाची चौकशी करून संबंधित ठेकेदारावर योग्य कारवाई करावी, अशी मागणीही निवेदनात केली आहे.
या निवेदनावर माणिक वाघमोडे व नाथा पाटील यांच्या स्वाक्षरी आहे.