नेर्ले येथील तरुणाच्या आत्महत्येेप्रकरणी चुलत्यासह तिघांविराेधात तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:33 IST2021-09-10T04:33:29+5:302021-09-10T04:33:29+5:30
याबाबत अधिक माहिती अशी की, मृत रविकिरण याचे शिक्षण डिप्लोमा मॅकॅनिकल इंजिनियरपर्यंत झाले आहे. यापूर्वी तो पुणे येथे खासगी ...

नेर्ले येथील तरुणाच्या आत्महत्येेप्रकरणी चुलत्यासह तिघांविराेधात तक्रार
याबाबत अधिक माहिती अशी की, मृत रविकिरण याचे शिक्षण डिप्लोमा मॅकॅनिकल इंजिनियरपर्यंत झाले आहे. यापूर्वी तो पुणे येथे खासगी कंपनीत नोकरीस होता. पुणे येथील नोकरी सोडून तो इतरत्र नोकरी मिळविण्याच्या प्रयत्नात असल्याने तो सध्या नेर्ले येथे आई-वडिलांसोबत राहात होता. रविकिरणच्या वडिलांचा आणि चुलते आनंदराव साळुंखे यांचा १९९७ पासून जमिनीसाठी इस्लामपूर न्यायालयात दावा हाेता. या दाव्यात रविकिरणचे वडील, आजी, आत्या आणि चुलता अशा चार वाटण्या झाल्या होत्या. त्यामुळे चुलता आनंदा साळुंखे याला २० गुंठे जमीन मिळाली, असा इस्लामपूर न्यायालयाचा निकाल झाला होता. नंतर रविकिरणचे वडील अशोक साळुंखे यांनी जिल्हा न्यायालयातून हा खटला उच्च न्यायालयात दाखल केला. याचा राग मनात धरून चुलता आनंदा कृष्णा साळुंखे, चुलती सुरेखा आनंदा साळुंखे, चुलत भाऊ दिग्विजय आनंदा साळुंखे वारंवार रविकिरणला त्रास देत हाेते. किरकोळ कारणावरून अंगावर कुऱ्हाड घेऊन धावून जाणे, शिवीगाळ करणे, टिंगल करणे, रात्रीच्यावेळी धमकावणे, असा छळ करीत हाेते. या छळाला कंटाळून दि. २६ ऑगस्ट रोजी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.
याबाबतची फिर्याद कासेगाव पोलीस ठाण्यास दिली आहे. सहायक पाेलीस निरीक्षक अविनाश मते, हवालदार महेश गायकवाड, सचिन चव्हाण, शिवाजी यादव अधिक तपास करीत आहेत.