जतमधील मुख्याध्यापकाविरोधात तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:50 IST2020-12-17T04:50:08+5:302020-12-17T04:50:08+5:30

जत : जत शहरातील जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा नंबर दोनचे मुख्याध्यापक शिवाजी विठ्ठल जाधव हे अपमानास्पद वागणूक देतात. ...

Complaint against the headmaster in Jat | जतमधील मुख्याध्यापकाविरोधात तक्रार

जतमधील मुख्याध्यापकाविरोधात तक्रार

जत : जत शहरातील जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा नंबर दोनचे मुख्याध्यापक शिवाजी विठ्ठल जाधव हे अपमानास्पद वागणूक देतात. मी दिव्यांग असल्यामुळे सतत शिवीगाळ करतात. वरिष्ठांकडे तक्रार करूनही दखल घेतली जात नाही. यामुळे जाधव यांच्याविरोधात कडक कारवाई करावी, अशी मागणी संगीता संतोषकुमार कांबळे या दिव्यांग शिक्षिकेने केली आहे. याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन दिले आहेे.

निवेदनात म्हटले आहे की, मी एक दिव्यांग शिक्षिका असून, माझा एक पाय पूर्णपणे निकामी आहे. या दिव्यांगावरून शिवाजी जाधव हे माझी सतत मानहानी व हेटाळणी करत आहेत. काहीवेळा मानसिक त्रास देऊन दिव्यांगावरून मला शिवीगाळ करतात. यासंदर्भात एक वर्षापूर्वी मी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा शिक्षणाधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार केली होती. त्याची चौकशी झाली आहे; परंतु कारवाई झाली नाही. यामुळे माझे मानसिक खच्चीकरण होत आहे. याची दखल घेऊन जाधव यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे.

Web Title: Complaint against the headmaster in Jat