बनपुरीतील शाळेच्या कामाबाबत तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:26 IST2021-01-08T05:26:08+5:302021-01-08T05:26:08+5:30

करगणी : बनपुरी (ता. आटपाडी) येथील जिल्हा परिषद शाळा खोल्याचे बांधकाम चुकीच्या पद्धतीने सुरू आहे. याप्रकरणी संबंधितांवर कारवाई करावी, ...

Complaint about school work in Banpuri | बनपुरीतील शाळेच्या कामाबाबत तक्रार

बनपुरीतील शाळेच्या कामाबाबत तक्रार

करगणी : बनपुरी (ता. आटपाडी) येथील जिल्हा परिषद शाळा खोल्याचे बांधकाम चुकीच्या पद्धतीने सुरू आहे. याप्रकरणी संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी संजय यमगर यांनी केली आहे. जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांना याबाबत निवेदन दिले आहे.

बनपुरी गावातील जिल्हा परिषद शाळा नं. १च्या वाढीव दोन खोल्यांचे काम सुरू झाले आहे. बांधकाम ठेकेदार हा गावातीलच असून, त्याने ठरलेल्या वेळेत बांधकाम सुरू न केल्याने आता घाईगडबडीत सुरुवात केली आहे. परिणामी गुणवत्तापूर्ण काम होत नसल्याबाबत शाखा अभियंत्यांकडे संपर्क साधला असता त्यांच्याकडून अरेरावीची भाषा येत आहे, असे संजय यमगर यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे. तसेच संबंधित कामाची समक्ष चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी संजय यमगर यांनी केली आहे.

Web Title: Complaint about school work in Banpuri