अरुण लाड यांचे सक्षम नेतृत्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:19 IST2021-07-04T04:19:18+5:302021-07-04T04:19:18+5:30

फोटो ओळ : कुंडल (ता. पलूस) येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आढावा बैठकीत अविनाश पाटील यांनी मार्गदर्शन केले. यावेळी ...

Competent leadership of Arun Lad | अरुण लाड यांचे सक्षम नेतृत्व

अरुण लाड यांचे सक्षम नेतृत्व

फोटो ओळ : कुंडल (ता. पलूस) येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आढावा बैठकीत अविनाश पाटील यांनी मार्गदर्शन केले. यावेळी आमदार अरुण लाड, बाबासाहेब मुळीक, बाळासाहेब पाटील, सुश्मिता जाधव, विराज नाईक, किरण लाड, शरद लाड, आदी उपस्थित होते.

कुंडल : अरुण लाड यांचे चांगले नेतृत्व आहे; त्यामुळे कोणी काहीही फुटकळ वक्तव्य केली तर त्यांना जास्त महत्त्व देऊ नका, ज्यांची विश्वासार्हता आधीच ढासळलेली आहे, त्यांच्यावर वक्तव्य करणे म्हणजे वेळ वाया घालवणे आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील यांनी केली.

कुंडल (ता. पलूस) येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार अरुण लाड, सरचिटणीस बाळासाहेब पाटील, कार्याध्यक्ष ॲड. बाबासाहेब मुळीक, विराज नाईक, किरण लाड, शरद लाड, नितीन नवले, सुश्मिता जाधव, पूजा लाड प्रमुख उपस्थित होते.

अविनाश पाटील म्हणाले, जिल्हाभर राष्ट्रवादी पालकमंत्री जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली फुलत आहे. पक्षाची ध्येयधोरणे सामन्यांच्या हिताची आहेत. त्यामुळे या पक्षाला कमी वेळात जनमत मिळाले आहे. पलूस आणि कडेगाव तालुक्यांत अरुण लाड यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी चांगले काम करीत आहे. त्यामुळे यांच्याच शिरावर ज्यांनी आजवर अनेक पदे भोगली तेच आज त्यांच्यावर टीका करीत आहेत, अशी बालिश वक्तव्ये करणाऱ्याच्या बुद्धीची कीव येते.

अरुण लाड म्हणाले, क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापूंच्या विचाराने हा पक्ष काम करतो. राष्ट्रवादी पक्षाकडे युवकांचे संघटन चांगले आहे, नीतिमूल्य असणाऱ्या पक्षाला ताकद देण्यासाठी युवकांनी जिवाचे रान करावे.

यावेळी पंचायत समितीचे उपसभापती अरुण पवार, मारुती चव्हाण, वैशाली मोहिते, नंदा पाटील, अरुणा जाधव, मृणाल पाटील, जयदीप यादव, सुरेश शिंगटे, विनायक महाडिक, प्राजक्ता जाधव, आदी उपस्थित होते.

Web Title: Competent leadership of Arun Lad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.