शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

संचारबंदीने नागरिकांना आणले ‘आॅनलाईन’वर : इंटरनेट बनला सेतू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2020 00:02 IST

आधुनिक युगातही प्रत्यक्ष बाजारात जाऊन खरेदी करण्याकडे लोकांचा कल असतो. तरुण पिढीमार्फत आॅनलाईन पद्धतीने वस्तू घरी मागविण्याचे प्रमाण वाढले आहे. तरीही संचारबंदीत आता कंपन्यांचे व्यवहार बंद पडले आहेत. कुरिअर सेवाही ठप्प आहे. बाजार व सर्व प्रकारचे व्यवहार थांबले आहेत.

ठळक मुद्दे ग्रामीण भागातही वाढला वापर; भाजीपाला, औषधांची मागणी, बँकिंग व्यवहारासाठी वापर

सांगली : कोरोनामुळे सुरू झालेल्या दीर्घकालीन संचारबंदीने आता नागरिकांना बहुतांश व्यवहार आॅनलाईन पद्धतीने करण्यास भाग पाडले आहे. घरपोहोच भाजीपाला, साहित्य पुरवठा सेवा, औषधे, तक्रारी, माहिती, बँकिंगचे व्यवहार, गॅसचे बुकिंग अशा प्रत्येक प्रकारच्या गोष्टी मोबाईल व संगणकीय इंटरनेटद्वारे केल्या जात आहेत. शहरी व ग्रामीण अशा दोन्ही स्तरावर अशाप्रकारचा आॅनलाईन व्यवहार कित्येक पटीने वाढला आहे.

आधुनिक युगातही प्रत्यक्ष बाजारात जाऊन खरेदी करण्याकडे लोकांचा कल असतो. तरुण पिढीमार्फत आॅनलाईन पद्धतीने वस्तू घरी मागविण्याचे प्रमाण वाढले आहे. तरीही संचारबंदीत आता कंपन्यांचे व्यवहार बंद पडले आहेत. कुरिअर सेवाही ठप्प आहे. बाजार व सर्व प्रकारचे व्यवहार थांबले आहेत. अशावेळी घरात बसूनच सर्व गोष्टींची तजवीज कशी करायची, असा प्रश्न संचारबंदीच्या सुरुवातीच्या दिवसात नागरिकांना सतावत होता. आता आॅनलाईन व्यवहारांनीच त्यासाठीचा मार्ग शोधून दिला आहे. घरपोहोच सेवा सुरू झाल्यानंतर त्यांची मागणी आॅनलाईन म्हणजेच मोबाईलच्या माध्यमातून नोंदविली जाते. त्यानंतर घरपोहोच सेवा पुरविण्यात येत आहे.

भाजीपाला, किराणा माल, औषधे अशा अत्यावश्यक गोष्टींकरिता आॅनलाईन व घरपोहोच सेवा सुरु झाली आहे. त्यामुळे याचा लाभ आता नागरिक घेत आहेत. बँकिंगचे व्यवहारही आॅनलाईन केले जात आहेत. पैसे काढणे, दुसऱ्याच्या खात्यावर टाकणे, खात्याचे स्टेटमेंट काढणे, आॅनलाईन अपडेशन अशा अनेक गोष्टी करता येत आहेत.

कार्यालयीन कामांसाठी वापरकार्यालयीन कामे घरातून करून देण्याची पद्धतही संचारबंदीने सुरू झाली आहे. त्यामुळे शासकीय, निमशासकीय, खासगी कंपन्यांची कामे आता घरात बसून आॅनलाईन पद्धतीने केली जात आहेत. त्यासाठी इंटरनेटचा वापर वाढला आहे. मेल, व्हॉटस् अ‍ॅप व अन्य सॉफ्टवेअर, अ‍ॅप्लिकेशनचा वापर यासाठी सुरू झाला आहे.

संगीत शिक्षण आॅनलाईनकाही खासगी क्लासेस, संगीत विद्यालयांकडून आॅनलाईन पद्धतीने विद्यार्थ्यांना धडे दिले जात आहेत. सांगलीतही गुरुकुल संगीत विद्यालयाने आॅनलाईन पद्धतीचा वापर करून प्रत्यक्ष व्हिडिओ कॉलिंगद्वारे संगीत शिक्षण देण्यास सुरुवात केली आहे. गुरुकुलच्या संस्थापक मंजुषा पाटील स्वत: राज्यभरातील विद्यार्थ्यांशी संपर्क करून गुरुकुल पद्धतीने संगीताचे धडे देत आहेत.

यापूर्वी या गोष्टींबाबत फारसे उत्सुक नसलेले लोकही आता आॅनलाईनचा पर्याय स्वीकारत आहेत.सततच्या वापरामुळे आॅनलाईन व्यवहाराबद्दल लोकांचे ज्ञानही वाढले आहे.जुन्या पिढीतल्या लोकांनाही या व्यवहारांची माहिती करून दिली जात आहे.आॅनलाईन वापरकर्त्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.वाढत्या वापरामुळे इंटरनेटवरील ताणही वाढत आहे.

आॅनलाईन रक्तचाचणी सेवेचा वापर वाढलाशहरातील काही रक्त तपासणी प्रयोगशाळांमार्फत आत्यावश्यक बाब म्हणून घरी येऊन रक्त तपासणी करणे व त्याचा अहवाल पाठवून देण्याची सेवा बजावत आहे. त्यामुळे डॉक्टरांच्या सूचनेनुसार अशा रक्त चाचण्यांसाठी आॅनलाईन व्यवहार केले जात आहेत.

टॅग्स :SangliसांगलीCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसonlineऑनलाइन