कृषी कायद्याविरुद्ध एकत्रित या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2020 04:28 IST2020-12-06T04:28:58+5:302020-12-06T04:28:58+5:30
नेवरी-विठ्ठलनगर (ता. कडेेेगाव) येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शाखेचे उद्घाटन व शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. याशिवाय बेलवडे ...

कृषी कायद्याविरुद्ध एकत्रित या
नेवरी-विठ्ठलनगर (ता. कडेेेगाव) येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शाखेचे उद्घाटन व शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. याशिवाय बेलवडे कडेपूर, शिवणी येथेही शाखांचे उद्घाटन करण्यात आले.
राजू शेट्टी म्हणाले, शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये पिकणाऱ्या शेतीमालास रास्त भाव मिळावा, यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेमध्ये सामील व्हावे.
यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सूर्यकांत मोरे, जिल्हा पक्षप्रमुख महेश खराडे, जिल्हा कार्याध्यक्ष संदीप राजोबा, ॲड विलास सावंत, जिल्हा उपाध्यक्ष राजू माने, तालुकाध्यक्ष बाळासाहेब जाधव, गोरख महाडिक, शिवाजी पाटील, नारायण वाघमोडे आदी उपास्थित होते.
चौकट :
कायदे कटकारस्थानातून
केंद्र सरकारने कटकारस्थान करून शेतकऱ्याला कॉर्पोरेट सेक्टरच्या घशात घालणारे कायदे केले आहेत. हमीभाव हा शेतकऱ्याचा जन्मसिद्ध हक्क आहे. तो काढून घेण्याचा प्रयत्न केल्याने अखंड देशातील करोडो शेतकरी रस्त्यावर उतरत आहेत, असे राजू शेट्टी यांनी सांगितले.
फोटो- 05kadegaon01
फोटो : नेवरी-विठ्ठलनगर (ता. कडेेेगाव) येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शाखेच्या उद्घाटनप्रसंगी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी, सूर्यकांत मोरे, महेश खराडे, संदीप राजोबा आदी उपस्थित होते.