शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

विश्वजित-संग्रामसिंहांच्या लढतीत अरुण लाड गटाची रंगतदार फोडणी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 07, 2019 5:55 AM

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आ. पतंगराव कदम यांच्या पश्चात पोटनिवडणुकीत त्यांचे पुत्र विश्वजित बिनविरोध आमदार झाले

श्रीनिवास नागे

सांगली : भाजपने विशेष लक्ष केंद्रित केलेल्या पलूस-कडेगाव मतदारसंघात काही वेगळ्या घडामोडी झाल्या नाहीत, तर यंदा युवा नेत्यांचा सामना पहायला मिळणार आहे. काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष आ. विश्वजित कदम यांना लढत देण्यासाठी भाजपने जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांचे नाव सहा महिन्यांपूर्वीच जाहीर केले आहे. त्यातच येथील अरुण लाड यांच्या तिसऱ्या गटानेही उचल खाल्ल्याने रंगत वाढली आहे.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आ. पतंगराव कदम यांच्या पश्चात पोटनिवडणुकीत त्यांचे पुत्र विश्वजित बिनविरोध आमदार झाले. त्यांच्यावर काँग्रेसच्या प्रदेश कार्याध्यक्षपदाची धुराही सोपवण्यात आली आहे. त्याचवेळी त्यांचे पारंपरिक विरोधक असलेल्या देशमुख गटाला भाजपने बळ दिले आहे. पृथ्वीराज देशमुख यांना भाजपचे जिल्हाध्यक्षपद आणि विधानपरिषदेची आमदारकी, तर त्यांचे चुलतबंधू संग्रामसिंह यांना जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची संधी मिळाली आहे. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पद्धतशीर देशमुख गटाला रसद पुरवली आहे. युतीतील जागावाटपात हा मतदारसंघ भाजपकडे घेण्यासाठी त्यांचा आग्रह आहे. विश्वजित यांच्याविरोधात तरुण चेहरा म्हणून संग्रामसिंह यांना पुढे आणण्यात आले आहे.विश्वजित कदम यांनी नेटाने वाढवलेला संपर्क, पुराच्या काळात केलेले उल्लेखनीय मदतकार्य, मजबूत संस्थात्मक बांधणी, कर्मचाऱ्यांचे जाळे, विकासकामे एकीकडे, तर देशमुख गटाने शासनाकडून आणलेला निधी आणि भाजपचे बळ दुसरीकडे, असा हा सामना आहे. त्यातच येथील क्रांती उद्योग समूहाच्या अरुण लाड गटानेही उचल खाल्ली आहे. ते राष्टÑवादीत असून, त्यांचे पुत्र जिल्हा परिषदेचे सदस्य शरद यांना शिवसेनेची ‘आॅफर’ आहे. आतापर्यंत त्यांची मदत देशमुख गटाला होत होती. आता ते देशमुख गटाने पैरा फेडावा, या प्रतीक्षेत आहेत.पाच वर्षात काय घडले?च्जिल्हा परिषदेत सत्तांतर. सत्ता भाजपकडे. पलूस-कडेगाव मतदारसंघातील ८ पैकी ६ जिल्हा परिषद मतदारसंघ भाजपकडे. जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद कदम गटाचे विरोधक संग्रामसिंह देशमुख यांच्याकडे.च्पलूस आणि कडेगाव नगरपंचायतींसह बहुसंख्य ग्रामपंचायतींमध्ये काँग्रेसचा दणदणीत विजय.च्सांगली-सातारा स्थानिक स्वराज्य संस्था गटातून पतंगराव कदम यांचे ज्येष्ठ बंधू मोहनराव कदम यांचा विजय.च्पतंगराव कदम यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत विश्वजित कदम विधानसभेवर बिनविरोध.च्देशमुख गटाच्या तुलनेत कदम गटाकडील सर्व सहकारी संस्था उत्तम स्थितीत कार्यरत.निवडणूक २०१४पतंगराव कदम (काँग्रेस)१,१२,५२३ मतेपृथ्वीराज देशमुख (भाजप)८८,४८९ मतेपोटनिवडणूक २०१८विश्वजित कदम (काँग्रेस)बिनविरोधसंभाव्य प्रतिस्पर्धीविश्वजित कदम (काँग्रेस)संग्रामसिंह देशमुख (भाजप)अरुण लाड (राष्टÑवादी)शरद लाड (राष्टÑवादी/शिवसेना)काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पतंगराव कदम यांच्या विचारानुसार आणि आ. मोहनराव कदम यांच्या मार्गदर्शनाखाली मतदारसंघाचा परिपूर्ण विकास करण्यासाठी झटत आहे. भाजपने खुली ‘आॅफर’ दिली असली, तरी काँग्रेस कधीच सोडणार नाही. कारण काँग्रेस आमच्या रक्तात आहे.- विश्वजित कदम, आमदार

टॅग्स :Vishwajeet Kadamविश्वजीत कदमSangliसांगलीElectionनिवडणूकSangli Electionसांगली महानगरपालिका निवडणूक