शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीशी तडजोड चालणार नाही! राजकीय लेबलं लावू नका, याकडे संकट म्हणून पाहा; राज ठाकरेंनी ठणकावलं
2
"ठाकरे बंधूंच्या ताकदीपुढे सरकारनं माघार घेतली; ही विजयाची पहिली पायरी, यापुढे..."
3
"मराठी बोला तुम्ही मराठी बोला...", मुंबईच्या लोकलमध्ये तरुणाईचा गजर, व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल!
4
येत्या ७ जुलैला सार्वजनिक सुट्टी मिळणार? सोमवारी जाहीर झाली तर काय काय बंद असणार...
5
तेलंगणात रसायनांनी भरलेल्या टँकरचा स्फोट, किमान १० कामगारांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
6
मर्यादेपेक्षाही अधिक महाग होणार चांदी; रॉबर्ड कियोसाकी यांच्या दाव्यात किती तथ्य?
7
दरोडा, खून...महाराष्ट्रासह चार राज्यांमध्ये १६ गंभीर गुन्हे; कुख्यात गुंडाचा उत्तर प्रदेशात एन्काउंटर
8
HDB Financial Services IPO : १२,५०० कोटींचा HDB Financial IPO हिट, बंपर प्रतिसाद; अलॉटमेंट कसं चेक कराल?
9
पुण्यातील लोणी काळभोरमध्ये लागले इराणचे झेंडे, खामेनींचे फ्लेक्स; Video व्हायरल...
10
तुमच्या गृहकर्जाचा हप्ता ४००० रुपयांनी होईल स्वस्त; बँक बदला आणि लाखो रुपये वाचवा! ही आहे पद्धत
11
"मी कितीही स्पष्टीकरण दिलं तरी...", ऐश्वर्यासोबत घटस्फोटाच्या चर्चांवर अभिषेक बच्चनने सोडलं मौन
12
ढगफुटी झाली आणि पूर आला; गाडी नदीत अडकता ड्रायव्हर चढला टपावर, पुढे काय झालं?
13
बँका तुमचं काम करत नाहीयेत, टेन्शन कशाला? RBI नं दिलीये सुविधा; 'इकडे' करू शकता त्यांची तक्रार
14
Ashadh Ritual 2025: आषाढात लेकीला माहेरी बोलावण्याची पूर्वापार प्रथा, केला जातो 'असा' कौतुक सोहळा!
15
Video:"...आता मला काय विचारताय तुम्ही"; एकनाथ शिंदे चंद्रशेखर बावनकुळेंवर का संतापले?
16
रतन टाटांनी करिअरची सुरुवात केलेल्या कंपनीला १००० कोटींची नोटीस! समोर आले धक्कादायक कारण
17
'मला न्याय हवा', खा. चंद्रशेखर यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप करणाऱ्या तरुणीचे PM मोदींना पत्र
18
PF मधून पैसे काढायचेत? पहिले जाणून घ्या तुमच्या कंपनीनं केलंय की नाही 'हे' काम? नाहीतर क्लेम होईल रिजेक्ट
19
Job Alert: पाच अशा नोकऱ्या, ज्या येत्या काळात संपून जातील; वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचा इशारा
20
कॅनरा बँकेतील सोन्यावर मारला डल्ला, ५३.२६ कोटींची चोरी; शाखा मॅनेजरच निघाला मुख्य सूत्रधार

Sangli: टेम्पो-दुचाकीची समोरासमोर भीषण धडक, एक जण ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2023 16:27 IST

द्राक्ष वाहतूक करणारा टेम्पो उलटला

दत्ता पाटीलतासगाव : तासगाव तालुक्यातील योगेवाडी हद्दीत गुहागर-विजापूर महामार्गावर टेम्पो अन् दुचाकीची समोरासमोर भीषण धडक झाली. या अपघातात कर्नाटक येथील रडारेड्डी (ता. अथणी) येथील संभाजी हाजीबा सावंत (वय 55) यांचा जागीच मृत्यू झाला. तर, द्राक्ष वाहतूक करणारा टेम्पो उलटला. आज, शुक्रवारी (दि.३१) दुपारच्या सुमारास हा अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच तासगाव पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला. याबाबत अधिक माहिती अशी, मयत संभाजी सावंत हे दुचाकीवरून (केए 23 ईजे 6795) तासगावच्या दिशेने नातेवाईकांकडे निघाले होते. तर वाळवा येथून द्राक्षभरून आंध्रप्रदेश मधील टेम्पो (एपी 39 युसी 0169) तासगावकडून  कवठेमंकाळच्या दिशेने निघाला होता. गुहागर - विजापूर महामार्गावर मनेराजुरी आणि योगेवाडीच्या हद्दीत दोन्ही वाहनांची जोरदार धडक झाली. या धडकेत दुचाकीस्वार सावंत जागीच ठार झाले. तर द्राक्ष वाहतूक करणारा टेम्पो रस्त्यावरून  पलटी झाला. या घटनेनंतर मनेराजुरीचे पोलिस पाटील दीपक तेली आणि योगेवाडीचे पोलिस पाटील मोहन सूर्यवंशी यांनी तासगाव पोलिसांना याबाबत माहिती दिली. माहिती मिळताच तासगाव पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत घटनेचा पंचनामा केला.

टॅग्स :SangliसांगलीAccidentअपघातDeathमृत्यू