शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

महाविद्यालयीन तरुणीची इमारतीवरुन उडी तर तरुणाने घेतला गळफास, कारण अस्पष्ट; सांगली जिल्ह्यातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2024 11:35 IST

मिरज : बामणोली (ता. मिरज ) येथील एकाच महाविद्यालयात शिकणाऱ्या मिरजेतील युवक व युवतीने एकापाठोपाठ आत्महत्या केली. साक्षी रवींद्र ...

मिरज : बामणोली (ता. मिरज) येथील एकाच महाविद्यालयात शिकणाऱ्या मिरजेतील युवक व युवतीने एकापाठोपाठ आत्महत्या केली. साक्षी रवींद्र जाधव (वय १६, रा. विद्यासागर काॅलनी, एस.टी. वर्कशाॅपजवळ, मिरज) या युवतीने मंगळवारी सायंकाळी महाविद्यालयाच्या दुसऱ्या मजल्यावरून उडी घेतली.त्यानंतर बुधवारी तिच्याच वर्गात शिकणाऱ्या प्रथमेश हणमंत पाटील (वय १७, मूळ गाव इरळी, ता. कवठेमहांकाळ, सध्या रा. सुभाषनगर, मिरज) याने राहत्या घरी गळफास घेऊन जीवन संपवले. दोन्ही आत्महत्यांचे कारण स्पष्ट झाले नसले तरी, एकापाठोपाठ झालेल्या या दाेन्ही घटनांचा पोलिस तपास करीत आहेत. एकाच महाविद्यालयातील दोघांच्या आत्महत्येमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.मृत साक्षी जाधव हिचे अभ्यासाकडे दुर्लक्ष हाेत हाेते. याबाबत शिक्षकांशी चर्चा करण्यासाठी तिचे आई-वडील मंगळवारी सायंकाळी महाविद्यालयात आले होते. आई-वडिलांना महाविद्यालयात पाहून घाबरलेल्या साक्षीने दप्तर बसमध्ये ठेवून महाविद्यालयाच्या दुसऱ्या मजल्यावर धाव घेतली. काेणाला काही कळण्यापूर्वी ती दुसऱ्या मजल्यावरून खाली पडली. डोक्याला व कमरेला मार लागल्याने गंभीर जखमी अवस्थेत तिला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचार सुरू असतानाच रात्री उशिरा तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.या घटनेचा तपास सुरू असताना याच महाविद्यालयात शिकणाऱ्या प्रथमेश पाटील याने मिरजेतील सुभाषनगर येथील घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. प्रथमेश पाटील हा मूळचा कवठेमहांकाळ तालुक्यातील इरळी गावचा आहे. त्याच्या शिक्षणासाठी पाटील कुटुंबीय सुभाषनगर येथे भाड्याच्या घरात राहतात. प्रथमेशचे वडील हणमंत पाटील हे जम्मू येथे सैन्यदलात असून, आई वैशाली पाटील, लहान भाऊ हर्षद पाटील यांच्यासह प्रथमेश सुभाषनगर येथे राहत होता.मंगळवारी महाविद्यालयातून आल्यानंतर प्रथमेश हा आई व भावासाेबत जेवण करून झोपी गेला. कुटुंबीय नेहमीप्रमाणे पहाटे त्याला उठविण्यास गेले. परंतु तो उठत नसल्याचे लक्षात येताच आजूबाजूच्या नागरिकांच्या मदतीने दरवाजा तोडण्यात आला. खोलीत प्रथमेश याने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. याबाबत माहिती मिळाल्यानंतर मिरज ग्रामीण पोलिस घटनास्थळी पोहोचले. मिरज शासकीय रुग्णालयात उत्तरीय तपासणी करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या दोघांनी आपली जीवनयात्रा का संपविली, याचे नेमके कारण समजू शकले नाही. कुपवाड एमआयडीसी आणि मिरज ग्रामीण पोलिस अधिक तपास करत आहेत.

टॅग्स :Sangliसांगलीmiraj-acमिरजCrime Newsगुन्हेगारी