आचारसंहितेपूर्वीच ‘भुयारी गटार’ला मंजुरी

By Admin | Updated: December 19, 2014 00:17 IST2014-12-18T23:33:43+5:302014-12-19T00:17:15+5:30

जयंत पाटील : मंजुरीचे पत्र मिरविणाऱ्यांना टोला

Before the Code of Conduct, the 'suburban drain' was approved | आचारसंहितेपूर्वीच ‘भुयारी गटार’ला मंजुरी

आचारसंहितेपूर्वीच ‘भुयारी गटार’ला मंजुरी

इस्लामपूर : शहरातील भुयारी गटारीस तत्कालीन केंद्रीय मंत्री कमलनाथ यांनी आचारसंहितेच्या अगोदरच मंजुरी दिली आहे़ मात्र आता काही मंडळी मंजुरीचे पत्र घेऊन श्रेय घेण्याचा प्रयत्न करीत आहेत, असा टोला माजी मंत्री आ. जयंत पाटील यांनी मारला.
इस्लामपूर शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, बुथ कमिट्यांचे सदस्य, तसेच शहरातील समस्त मतदारांचे आभार मानण्यासाठी आयोजित समारंभात आ़ पाटील बोलत होते. नगराध्यक्ष सुभाष सूर्यवंशी, माजी नगराध्यक्ष विजयभाऊ पाटील, चिमण डांगे, उपनगराध्यक्ष संजय कोरे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बी़ के. पाटील, शहराध्यक्ष शहाजी पाटील, युवक शहराध्यक्ष खंडेराव जाधव, महिला शहराध्यक्षा सौ़ रोझा किणीकर यांची प्रमुख उपस्थित होती.
आ़ पाटील म्हणाले की, जनतेवर मनापासून प्रेम केल्यानेच मी विधानसभा निवडणुकीत सहाव्यांदा विजयी झालो. आता या शहरातील भुयारी गटारी, चोवीस तास पाणी, विजेच्या तारा जमिनीतून नेणे आणि ही सर्व कामे झाल्यानंतर शहरातील रस्ते अद्ययावत करणे, ही आपणा सर्वांसमोरची आव्हाने आहेत़ . शहराच्या उरूण, शहर व उपनगर या तीन भागातील ५१ बुथ कमिट्यांच्या कार्यकर्त्यांनी या शहरातून १७ हजार ५00 मताधिक्य मिळवून देण्यात मोलाचे योगदान केले़
विजयभाऊ पाटील, सौ़ रोझा किणीकर, चिमण डांगे, खंडेराव जाधव, भगवान पाटील, अ‍ॅड. सुधीर पिसे, सौ़ अलका शहा यांचीही भाषणे झाली. शहाजी पाटील यांनी प्रास्ताविक, माजी उपनगराध्यक्ष शंकरराव चव्हाण यांनी आभार, बजरंग कदम यांनी सूत्रसंचालन केले़.
प्रा़ शामराव पाटील, आनंदराव मलगुंडे, बाळासाहेब पाटील, संजय पाटील, सुरेंद्र पाटील, पीरअली पुणेकर, रणजित गायकवाड, डॉ़ संग्राम पाटील, सौ़ कमल पाटील, सदाशिव पाटील, वाय़ एस. जाधव, अ‍ॅड़ दिलीप पाटील, नंदकुमार कुंभार, सौ़ उषा मोरे, विश्वास धस, डॉ़ अतुल मोरे उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: Before the Code of Conduct, the 'suburban drain' was approved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.