शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

सांगली शहरातील उपमार्ग सील संचारबंदीच्या कडक अंमलबजावणीसाठी निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2020 15:14 IST

गावभागातील नागरिकांना येण्यासाठी प्रशिक चौकातील मार्ग खुला ठेवून इतर सर्व उपरस्ते बंद करण्यात आले आहेत

सांगली : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी संचारबंदी आदेश लागू असतानाही त्याचे नागरिकांकडून उल्लंघन होत असल्याने शुक्रवारी पोलीस प्रशासनाने सांगली शहरातील प्रमुख मार्गांना जोडणारे रस्ते सील केले आहेत. नाकाबंदीवेळी विनाकारण फिरणार्‍या वाहनचालकांवर कारवाईसाठी हा मार्ग अवलंबविण्यात आला आहे. 

कोरोनाचा प्रार्दूभाव वाढू नये यासाठी प्रशासनाच्यावतीने संपूर्ण संचारबंदीचे आदेश लागू केेले आहेत. त्यात केंद्र सरकारने ३ मेपर्यंत लॉकडाऊन वाढविला आहे. या कालावधीत अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व वाहतूक बंद असलीतरी अनेक वाहनचालक विनाकारण रस्त्यावर फिरताना दिसत आहेत. यामुळे गर्दी होत असून संसर्ग रोखण्यासाठी आता पोलीस प्रशासनाने कडक पावले उचलण्यास सुरूवात केली आहे. 

त्यानुसार गुरूवारी संजयनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मंगळवार बाजार रोडसह इतर रस्ते सील करण्यात आले होते. शुक्रवारी शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रस्ते बॅरेकेटस लावून बंद करण्यात आली आहेत. त्यानुसार खणभागातील पंचमुखी मारूती रोडवरील वाहतूक सुरू असून लोकशाहीर आण्णाभाऊ साठे कमानीपासून येणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे. याशिवाय या मार्गाना जोडणोरे उपरस्ते बांबू लावून बंद केले आहेत. 

गावभागातील नागरिकांना येण्यासाठी प्रशिक चौकातील मार्ग खुला ठेवून इतर सर्व उपरस्ते बंद करण्यात आले आहेत. यासह शामरावनगर, हनुमाननगर, नवीन वसाहत परिसरातील रस्तेही बंद करण्याचे नियोजन आहे.  शहरात अचानक रस्ते बांबू लावून, बॅरेकॅटस लावून बंद केली जात असल्याने चर्चा सुरू झाली होती मात्र, कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी व विनाकारण फिरणार्‍या वाहनचालकांवर कारवाईसाठीच ही मोहिम सुरू केल्याचे प्रशासनाच्यावतीने स्पष्ट करण्यात आले. एकाच भागाला जोडणारे दोन रस्ते असल्यास एकाच मार्गाचा वापर होणार असल्याने नाकाबंदीवेळी विनाकारण फिरणार्‍या वाहनचालकांवर कारवाईसाठी हा उपाय प्रभावी ठरणार असल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसSangliसांगलीPoliceपोलिस