‘डोंगराई’ला गुराख्यांचा विळखा

By Admin | Updated: August 23, 2015 23:38 IST2015-08-23T23:36:05+5:302015-08-23T23:38:23+5:30

वृक्षांचे नुकसान : वनविभागाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष; नागरिकांत नाराजी

The clods of the cattle were set up in 'Dongrai' | ‘डोंगराई’ला गुराख्यांचा विळखा

‘डोंगराई’ला गुराख्यांचा विळखा

नंदकुमार मोहिते ल्ल तोंडोली
महाराष्ट्र, कर्नाटकातील लाखो भाविकांचे शक्तीस्थळ असलेले कडेपूर (ता. कडेगाव) येथील डोंगराई देवीचे तीर्थक्षेत्र गुराख्यांच्या विळख्यात सापडले आहे. डोंगरावरील झाडांचे गुराख्यांमुळे मोठे नुकसान होत असून, याकडे वनविभागानेही दुर्लक्ष केले आहे.
कडेगावच्या दक्षिण दिशेला असलेल्या डोंगरावर डोंगराई देवीचे प्राचीन मंदिर असून, श्रावण महिन्यात मंगळवार व शुक्रवार तसेच नव्याची पौर्णिमा या दिवशी मोठी जत्रा भरते व भाविकांची अलोट गर्दी पहावयास मिळते.
कडेगाव-पलूसचे आमदार व माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम यांनी या डोंगराई मंदिर व परिसरास पर्यटस्थळाचा दर्जा मिळवून देऊन कोट्यवधींचा निधी मिळवून दिला. त्यांच्या वनखात्याच्या कारकीर्दीत या शेकडो एकराच्या डोंगरावर हजारो वृक्षांची लागवड केली. ही लागवड करताना झाडांना शेणखत टाकून रोपे लावल्यामुळे वाढ चांगली झाली. परंतु सध्या या सर्व वृक्षलागवडीची विल्हेवाट सुरूझालेली पहावयास मिळते.
कडेगाव, कडेपूर, हिंगणगाव, तडसर आदी गावांतील गुराखी खुलेआम या डोंगरावर गुरे चारण्यासाठी येत आहेत. चरण्यासाठी आलेल्या गुरांकडून खूप मोठ्या प्रमाणावर बहरू लागलेल्या रोपांवर व छोट्या झाडांवर हानी पोहोचत आहे. काही गुराख्यांकडून या छोट्या झाडांवर कुऱ्हाडही चालवली जात आहे. मुळाशी काही कुऱ्हाडीचे घाव घातले जातात व आठ-दहा दिवसांनी ते झाड वाळले की जळणासाठी नेले जात आहे.
डोंगराई परिसराला गुराख्यांचा विळखा पडत आहे. परंतु निद्रिस्त अवस्थेत असलेल्या वनविभागाला मात्र त्याकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नसल्याचे पहावयास मिळते. वृक्षांवर प्रेम करणारे परिसरातील सर्व वृक्षमित्र व श्री डोंगराई देवी तीर्थक्षेत्रावर अढळ श्रद्धा असणाऱ्या सर्व भाविकांमधून गुराख्यांच्या दुष्कृत्याबद्दल संतप्त भावना आहेत.
वन विभागाने रोपांची व वृक्षांची नासाडी करणाऱ्या जनावरांना व त्यांना घेऊन येणाऱ्या गुराख्यांना या परिसरात यायला मज्जाव करावा, अशी मागणी नागरिकांतून होऊ लागली आहे.

Web Title: The clods of the cattle were set up in 'Dongrai'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.