शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
2
"हिंदी भाषा सक्ती असू नये, पण विद्यार्थ्यांनी द्वेष करु...", भाषेवरुन शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
"मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून गाठीभेटी घेतात"; ठाकरेंच्या टीकेवर CM फडणवीस म्हणाले, "बोलबच्चन असलेल्यांना..."
4
वंदे भारत एक्सप्रेसमध्ये भाजपा आमदारानं समर्थकांसह प्रवाशाला केली बेदम मारहाण
5
IND vs ENG : हेडिंग्लेच्या मैदानात कसा राहिलाय टीम इंडियाचा रेकॉर्ड? जाणून घ्या सविस्तर
6
इस्त्रायलने २००० किलोमीटरवरुन क्षेपणास्त्र डागले ! इराणचे अणु केंद्र उद्ध्वस्त केले; सॅटेलाईट फोटो आले समोर
7
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
8
दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं असं वाटतं का? सायली संजीव म्हणाली- "त्या दोघांनाही..."
9
एअर इंडिया विमान अपघातात सापडलेल्या ७० तोळे सोने आणि रोख रकमेवर कुणाचा हक्क? कायदा काय सांगतो?
10
UCO Bank Case: अभय लोढा यांची दोषमुक्तता करण्यास सीबीआय न्यायालयाने दिला नकार!
11
Israel Stock Market : हल्ल्याच्या बातमीनंतरही इस्रायलचा शेअर बाजार सुस्साट; ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर, कारण काय?
12
"आम्ही बहीण-भाऊ आहोत, शंका घेऊ नका"; एकाच स्कार्फने दोघांनी संपवले आयुष्य, सोलापुरात खळबळ!
13
Iran-Israel War : भारताचे ४७७० कोटी रुपये धोक्यात, इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर सर्व केलेल्यावर पाणी फेरलं जाईल
14
Viral Video: वा क्या कारीगरी है; विजेच्या खांबातून रस्ता, बंगळुरूतील व्हिडीओ व्हायरल, तुम्ही बघितला का?
15
Sonam Raghuvanshi : पिठाच्या गिरणीतून थेट कोट्यवधींचे साम्राज्य! सोनम रघुवंशीचे वडील इतके श्रीमंत कसे झाले?
16
Yogini Ekadashi 2025: योगिनी ते आषाढी एकादशी, १५ दिवस ऐका 'हे' स्तोत्र; मिटेल चिंता, होईल अपार लाभ!
17
"मला सक्रीय राजकारणात यायचंय", सायली संजीवने व्यक्त केली इच्छा; म्हणाली...
18
गरिबांच्या खिशावर ‘दरोडा’ टाकणाऱ्या लाचखोरांच्या मालमत्तेवर ‘हातोडा’ कधी?
19
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
20
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली

पक्षाचे चिन्ह घड्याळ, ..पण माझं कधीच जमलं नाही, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांचे विधान 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2022 17:52 IST

आता तर हात व धनुष्यबाणाच्या नादाला लागून घड्याळ्याची वेळ चुकू लागली आहे. असे म्हणताच सभागृहात एकच हशा पिकला.

सांगली : कोणत्याही कार्यक्रमाला मला यायला नेहमीच उशीर होतो. आमच्या पक्षाचे चिन्ह घड्याळ असले, तरी माझे व घड्याळाचे कधीच जमले नाही, असे मत जलसंपदामंत्री व राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केले.सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या गुलाबराव पाटील पुरस्कार प्रदान सोहळ्याच्या वेळी त्यांनी अनेकांना चिमटेही काढले. जयंत पाटील हे उशिरा येण्याच्या त्यांच्या सवयीबद्दल बोलत असतानाच, त्यांना मध्येच थांबवत आमदार अनिल बाबर म्हणाले की, चिन्हाचे नाव घेऊ नका, उगीच प्रचार होईल. 

त्यावर जयंत पाटील म्हणाले की, आता तर हात व धनुष्यबाणाच्या नादाला लागून घड्याळ्याची वेळ चुकू लागली आहे. यावर सभागृहात एकच हशा पिकला. लगेच स्वत:ला सावरत जयंतरावांनी हा विनोदाचा भाग आहे, असे स्पष्ट केले.ते म्हणाले की, काही जिल्हा बँकांमध्ये आता मंत्रीही संचालक मंडळात वर्णी लावून घेत आहेत, ही गोष्ट चुकीची आहे. मंत्र्यांनी स्वत:ची वर्णी न लावता, आपल्या विश्वासू कार्यकर्त्यांना संधी देण्याची गरज आहे. गुलाबराव पाटील यांनी नेहमी नैतिकता, स्वच्छ चारित्र्य या बळावर राजकारण, समाजकारण केले. त्यांचा अंगीकार सध्याच्या राजकारण्यांनी करायला हवा. चांगले काम केलेल्या माणसाची लोक नेहमीच दीर्घकाळ पूजा करतात, अगदी त्याप्रमाणेच गुलाबराव पाटील हे मनाने उमदे, निस्पृह असल्याने व त्यांनी सहकारात केलेल्या कामामुळे त्यांच्याबद्दल आजही राज्यभरात विलक्षण आदर आहे.दिग्ग्ज संचालकांची दांडीकार्यक्रमास काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष व बँकेचे संचालक विशाल पाटील, बँकेचे माजी अध्यक्ष दिलीपतात्या पाटील, माजी उपाध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, महेंद्र लाड, राहुल महाडिक, प्रकाश जमदाडे या दिग्गज संचालकांची गैरहजेरी चर्चेचा विषय ठरली होती. त्यात सहकार राज्यमंत्री विश्वजीत कदमही हेही कार्यक्रमाच्या ठिकाणी उशिरा आले. त्यामुळे कार्यक्रमाच्या ठिकाणी याबाबतची चर्चा रंगली होती.

टॅग्स :SangliसांगलीJayant Patilजयंत पाटील