शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितचा स्वभाव मला माहीत आहे, तो कधीही...; निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पवारांचं मोठं वक्तव्य
2
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
3
राज ठाकरेंचा भुजबळांवर हल्लाबोल; मुख्यमंत्र्यांनी बाजू सावरली, म्हणाले...
4
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
5
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
6
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
7
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
8
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
9
Smriti Irani : "अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात
10
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
11
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
12
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
13
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
14
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
15
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
16
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
17
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
18
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
19
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
20
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका

विटा पंचायत समितीचा लिपिक निलंबित; जिल्हा परिषदेकडून तडकाफडकी कारवाई

By अशोक डोंबाळे | Published: December 05, 2023 7:27 PM

महिला डॉक्टरांशी गैरवर्तन अंगलट

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : विटा (खानापूर) पंचायत समितीमधील जलसंधारण विभागातील कनिष्ठ सहायक अजय मुगूटराव माने यांनी महिला डॉक्टरांशी गैरवर्तन केल्याप्रकरणी जिल्हा परिषदेने मंगळवारी त्यांच्यावर तडकाफडकी निलंबनाची कारवाई केली. संबंधित कर्मचाऱ्याची खातेनिहाय चौकशी करून पुढील कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी दिली.

खानापूर तालुक्यातील एका गावात महिला पशुधन विकास अधिकारी यांना म्हशीवर उपचार करण्यासाठी बोलावून घेतले. विटा पंचायत समितीमध्ये काम करीत असलेले अजय माने यांची म्हैस होती. या म्हशीवर वेळेवर उपचार करण्यासाठी त्या गावातील एका ग्रामपंचायत सदस्याने महिला पशुधन विकास अधिकाऱ्यांना दमदाटी केल्याचे पोलिस तक्रारीत म्हटले आहे. या गंभीर प्रकाराबद्दल महाराष्ट्र राज्य राजपत्रित पशुवैद्यक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी संबंधित व्यक्तीवर तातडीने कारवाई करण्याची मागणी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्याकडे सोमवारी केली होती. या तक्रारीची गंभीर दखल घेऊन धोडमिसे यांनी तातडीने विटा पंचायत समितीमधील कनिष्ठ सहायक अजय माने यांना निलंबित केले आहे. तसेच खातेनिहाय चौकशी करून पुढील कारवाई करण्यात येणार आहे.ग्रामपंचायत सदस्याला नोटीसग्रामपंचायतीचे सदस्य गणेश पांडुरंग माने यांनी महिला पशुधन विकास अधिकारी पशुधनाच्या उपचारासाठी गावात आल्या होत्या. यावेळी त्यांच्याशी गैरवर्तन केल्यामुळे गणेश माने यांना ग्रामपंचायत अधिनियम १९५८ (३९/१) नुसार जिल्हा परिषदेने नोटीस बजावली आहे. नोटिसीचा खुलासा आल्यानंतर सदस्यत्व रद्दचा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविण्यात येणार आहे.

टॅग्स :suspensionनिलंबन