शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत दीड लाखाची लाच घेताना कारकुनास अटक, जमिन विक्रीची परवानगी देण्यासाठी दोन लाखांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2023 13:31 IST

त्याचबरोबर रोजगार हमी योजनेत कार्यरत असणाऱ्या लिपिक दिलीप निवृत्ती देसाई यास लाच देण्यास प्रोत्साहित केल्याबद्दल ताब्यात घेतले

सांगली : महार वतन जमिनीची विक्री करण्यासाठी जमीन मालकाला परवानगी देण्यासाठी दीड लाखाची लाच स्वीकारताना जिल्हाधिकारी कार्यालयाकडील कुळवहीवाट शाखेतील अव्वल कारकून अनंता विठ्ठलराव भानुसे (वय ५९, रा. क्रांतीनगर, विजयनगर, सांगली) याला सोमवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. त्याचबरोबर रोजगार हमी योजनेत कार्यरत असणाऱ्या लिपिक दिलीप निवृत्ती देसाई यास लाच देण्यास प्रोत्साहित केल्याबद्दल ताब्यात घेतले आहे.महार वतनाची जमीन विक्री करण्याची परवानगी मिळण्याकरिता तक्रारदार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात दिलेला अर्ज वरिष्ठांना सांगून मंजूर करून देण्यासाठी स्वत:करिता व वरिष्ठांना देण्याकरिता दोन लाखांच्या लाचेची मागणी अनंता भानुसे याने केली होती. त्याबाबत तक्रारदारांनी १९ जानेवारी रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली.विभागाने तक्रारीची पडताळणी केली. याप्रकरणात रोहयोमधील लिपिक दिलीप देसाई यांनी तक्रारदारांना भानुसे यांना लाच देण्यास प्रोत्साहित केल्याचे निष्पन्न झाले. चर्चेअंती भानुसे याने दीड लाखावर तडजोड केली.सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील उपाहारगृहाच्या आवारात दुपारच्या सुमारास भानुसे याला लाच देण्याचे ठरले होते. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने परिसरात सापळा लावला. तक्रारदारांकडून दीड लाखाची लाच घेताना भानुसे याला रंगेहाथ अटक करण्यात आली.लिपिक दिलीप देसाई यालाही ताब्यात घेण्यात आले. दोघांविरुद्ध विश्रामबाग पोलिस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक सरदार नाळे, पोलिस निरीक्षक दत्तात्रय पुजारी, विनायक भिलारे यांच्या पथकाने केली.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीBribe Caseलाच प्रकरणPoliceपोलिस