शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छता ठेक्यात गुंतले पदाधिकाऱ्यांचेच हात ! तासगाव नगरसेवकांचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2018 22:43 IST

दत्ता पाटील ।तासगाव : तासगाव शहराच्या स्वच्छतेचा ठेका कायम ठेवण्यात पदाधिकाºयांचे हात गुंतले असल्याची चर्चा शहरात सुरु झाली आहे. सत्ताधारी भाजप च्या पक्षीय बैठकीत नगरसेवक जाफर मुजावर यांनीच असा आरोप केल्याने या चर्चेला उधाण आले आहे.गुरुवारी झालेल्या सभेत भाजप आणि राष्टवादी कडून या ठेक्याच्या विषयाला बगल देत, ठेका कायम ठेवण्यासाठी ...

दत्ता पाटील ।तासगाव : तासगाव शहराच्या स्वच्छतेचा ठेका कायम ठेवण्यात पदाधिकाºयांचे हात गुंतले असल्याची चर्चा शहरात सुरु झाली आहे. सत्ताधारी भाजपच्या पक्षीय बैठकीत नगरसेवक जाफर मुजावर यांनीच असा आरोप केल्याने या चर्चेला उधाण आले आहे.

गुरुवारी झालेल्या सभेत भाजप आणि राष्टवादीकडून या ठेक्याच्या विषयाला बगल देत, ठेका कायम ठेवण्यासाठी एकमत केल्याचे चित्रही पाहायला मिळाले असून ठेक्याला मिळालेल्या अभयाचे गौडबंगाल काय? असा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

तासगाव नगरपालिकेने कोट्यवधी रुपयांचा स्वच्छतेचा ठेका शहरातीलच राष्टÑवादीच्या पदाधिकाºयाला दिला. हा ठेका देताना बहुतांश नियमांची पायमल्ली करण्यात आली. इतके करूनदेखील शहरात स्वच्छतेचा बोजवारा कायम आहे. काही महिन्यांपासून भाजप आणि राष्टÑवादीच्या बहुतांश नगरसेवकांनी या ठेक्याविरोधात आवाज उठवला. त्यावेळी नगराध्यक्ष डॉ. विजय सावंत यांनी स्वच्छ भारत अभियान संपल्यानंतर होणाºया सभेत हा विषय अजेंड्यावर घेण्याचे आश्वासन देऊन विषय लांबणीवर टाकला होता.

नगराध्यक्षांच्या आश्वासनानुसार गुरुवारच्या सभेत हा विषय अजेंड्यावर येईल, अशी अपेक्षा होती. मात्र हा विषय अजेंड्यावर नसल्याने भाजपच्याच काही नगरसेवकांनी मोठा रोष व्यक्त केला होता. ठेका रद्द करण्याचा विषय अजेंड्यावर घेण्याची मागणी करूनदेखील विषय ऐरणीवर येत नसल्याने नगरसेवक जाफर मुजावर यांनी पक्षीय बैठकीत, यामागे ठेकेदाराशी लागेबांधे आहेत काय? असा गंभीर आरोप केला होता.

गुरुवारी झालेल्या सभेत स्वच्छता आणि ठेका या विषयावर पदाधिकाऱ्यांसह कोणत्याच नगरसेवकाने चर्चा केली नाही. त्यामुळे ठेक्याला मिळणारे अभय आणि ठेकेदाराची पाठराखण चांगलीच चर्चेत आली आहे.ठेकेदार हा राष्टवादीचा पदाधिकारी असल्याने राष्टवादीकडून होणारी पाठराखण राजकीय असू शकते. मात्र भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून ठेकेदाराची पाठराखण का केली जात आहे? हा प्रश्न कायम असून, पदाधिकाऱ्यांच्या सोयीमुळे शहरातील नागरिकांना मात्र स्वच्छतेबाबत गैरसोयींचा सामना करावा लागत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.जॅकवेलचाही ठेकापाणी पुरवठ्याचे जॅकवेल ठेका पध्दतीने चालविण्यास देण्याचा ठरावही सर्वसाधारण सभेत घेण्यात आला. राष्टÑवादीने या ठरावाला विरोध केला. त्यानंतर ठराव मताला टाकून बहुमताच्या जोरावर हा ठराव मंजूर झाला. यावेळी घनकचरा व्यवस्थापनासाठी शासनाकडून मंजूर झालेला ३ कोटी ५४ लाखांचा निधी खर्च करण्याचा विषयही मंजूर करण्यात आला.

टॅग्स :SangliसांगलीSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान