शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: शिक्षिकेच्या धमकीने मालगावातील क्लासचालकाने संपवले जीवन, दोघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2024 15:11 IST

पैशासाठी मारहाण करीत मोबाईलवर चित्रीकरण

मिरज : मालगाव (ता. मिरज) येथील खासगी क्लासचालक सुधाकर सावंत यांच्या आत्महत्येप्रकरणी त्यांची सहकारी शिक्षिका नम्रता सदाफुले व तिचा चुलत मामा नंदकुमार कदम (रा. मालगाव) या दोघांना शुक्रवारी अटक करण्यात आली. पैशासाठी या दाेघांनी सुधाकर सावंत यांना मारहाण करीत माेबाईलमध्ये चित्रीकरण करून धमकावल्यानेच सावंत यांनी आत्महत्या केल्याची तक्रार आहे.गेल्या ३० वर्षांपासून मालगाव येथे कोचिंग क्लासेस घेणारे सुधाकर सावंत यांनी दि. २६ जून रोजी घराशेजारील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली हाेती. त्यांच्या क्लासमध्ये सहकारी शिक्षिका म्हणून नम्रता नारायण सदाफुले यांची ६० टक्के आर्थिक भागीदारी होती. मृत्युपूर्वी सुधाकर यांनी नम्रता सदाफुले व नंदकुमार कदम हे आपल्याला मानसिक त्रास देत असल्याचे तसेच कदम हा फोनवरून शिवीगाळ करीत दमदाटी करत असल्याचे पत्नीला सांगितले होते. सुधाकर सावंत यांच्या आत्महत्येच्या आठवडाभरापूर्वी नम्रता सदाफुले व नंदकुमार कदम यांनी क्लासमध्ये येऊन सुधाकर सावंत यांना बेदम मारहाण केली. यानंतर सावंत यांच्या खात्यावरून १० हजार रुपये नम्रता सदाफुले यांनी जबरदस्तीने आपल्या खात्यावर घेतले होते. मृत्यूनंतर सावंत यांच्या मोबाईलमध्ये कदम याच्यासोबतचे संभाषण कुटुंबीयांना आढळले. या संभाषणात नम्रता सावंत यांना मारहाण करुन व्हिडीओ केल्याचा तसेच नम्रता हिने आपले क्लासचे मानधन पाच वर्षांसाठी शंभर टक्के वाढवून घेतल्याचे समजले.याबाबत सावंत यांच्या पत्नी आशाराणी सावंत यांनी नम्रता सदाफुले व तिचा चुलत मामा नंदकुमार कदम यांच्या मानसिक व शारीरिक त्रासाला कंटाळून सुधाकर सावंत यांनी विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची तक्रार ग्रामीण पोलिसात दिली आहे. सावंत यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पोलिसांनी नम्रता सदाफुले व नंदकुमार कदम यांना अटक केली आहे. न्यायालयाने दोघांना तीन दिवस पोलिस कोठडी सुनावली आहे.बदनाम करण्याची धमकीमारहाणीचे चित्रीकरण करत काही चुकीच्या गोष्टी त्यांच्याकडून वदवून घेतल्या होत्या. ‘तुला बदनाम करतो, तुझा क्लास संपवतो, माझे मानधन वाढवून दिले नाहीस तर तुला सोडणार नाही’ अशा धमक्या देत सदाफुले व कदम यांनी सावंत यांचे चित्रीकरण केले.

टॅग्स :SangliसांगलीTeacherशिक्षकCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस