शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

Sangli News: मिरवणुकीच्या वादातून दोन गटात हाणामारी; १५ जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2023 12:40 IST

गेल्या काही दिवसांपासून दोन गटात वाद धुमसत होता

दरीबडची : अक्कळवाडी (ता. जत) येथे मिरवणुकीच्या वादातून दोन गटात झालेल्या जोरदार हाणामारीत १५ जण जखमी झाले. ही घटना गुरुवारी रात्री १० वाजता घडली. याबाबत उमदी पोलिस ठाण्यात परस्परविरोधी फिर्याद दाखल झाली आहे. संशयितांमध्ये सरपंच, उपसरपंचासह दोन्ही गटाच्या ४४ व अनोळखी ७० जणांवर गुन्हा दाखल आहे.अक्कळवाडी येथे गेल्या काही दिवसांपासून दोन गटात वाद धुमसत होता. गुरुवारी रात्री गावात मिरवणूक होती. यावेळी दोन्ही गटात पुन्हा वादाला तोंड फुटले आणि तुंबळ हाणामारी झाली. दोन्ही गट लोखंडी गज, काठ्या, दगड, चाकू अशी हत्यारे घेऊन एकमेकांवर धावून गेले.हाणामारीत नजीरसाब बंदगीसाब इनामदार, लतीफ मेहबूब इनामदार, सद्दाम मकबूल इनामदार, जब्बार मकबूल इनामदार, मेहबूब मोदीनसाब बालगाव, झुलेखा रजाक पटेल, सैनाज शब्बीर मुल्ला, बियामा मेहबूब इनामदार, रविकुमार मलकाप्पा हलसंगी, सुनील सोनगी, अनिल सोनगी, मंजुनाथ मलकाप्पा मलाबादी, श्रीशैल बसगोंड मलाबादी, काशिनाथ बसगोंड मलाबादी, गजानन रमेश मलाबादी हे जखमी झाले. त्यांच्यावर मिरज शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.नजीरसाब बंदगीसाब इनामदार यांच्या फिर्यादीवरून सरपंच शिवानंद चन्नाप्पा मलाबादी, उपसरपंच सुनील नागाप्पा शेजाळे, रेवणसिद्ध शिवराया पाटील, श्रीशैल बसाप्पा मलाबादी, विश्वनाथ मलकाप्पा मलाबादी यांच्यासह २५ जण तसेच अन्य ४० अनोळखींविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

रविकुमार मलकाप्पा हलसंगी यांच्या फिर्यादीवरुन इस्ताक अली रसूलसाब बालगाव, सद्दाम मकबूल इनामदार, लतीब महेबूब इनामदार, रज्जाक हुसेनसाब बालगाव, पैगंबर मीरासाब बालगाव यांच्यासह १९ जण व अन्य ३० अनोळखींविरोधात उमदी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

गावात पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला असून दंगल नियंत्रण पथकही तैनात आहे. जत पोलिस ठाण्याचे निरीक्षक राजेश रामाघरे, कवठेमहांकाळचे पोलिस निरीक्षक जितेंद्र शहाणे, उमदी पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक पंकज पवार, उपनिरीक्षक एस. एस. शिंदे, लक्ष्मण खरात हे रात्रीपासून तळ ठोकून होते. शुक्रवारी अतिरिक्त उपविभागीय अधिकारी आश्विनी शेंडगे यांनी गावात भेट देऊन बंदोबस्ताबाबत सूचना दिल्या.गावच्या सीमेवर पोलिस बंदोबस्त

सध्या कर्नाटक विधानसभा निवडणुका सुरू आहेत. अक्कळवाडी गाव कर्नाटक सीमेवर आहे. यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी गावच्या सीमेवर बॅरिकेड लावून पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस