शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

Sangli News: किरकोळ कारणावरून मिरजेत दोन गटात तुफान हाणामारी, पोलिसांनी लाठीमार करून जमावाला पांगवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2023 14:13 IST

परस्परविरोधी तक्रारींवरून नगरसेविका पुत्रासह दोन्ही गटाच्या सुमारे ५० जणांविरुद्ध गुन्हा दाखल

मिरज : मिरजेत सोमवारी रात्री जवाहर चौक व गोठण गल्ली परिसरात किरकोळ कारणावरून दोन गटात वाद होऊन जमावाने परस्परांवर तुफान दगडफेक केली. यावेळी चारचाकी व दुचाकी वाहनांची मोडतोड करण्यात आली. याबाबतची माहिती मिळताच घटनास्थळी धावलेल्या पोलिसांनी लाठीमार करून जमावाला पांगवले. याबाबत परस्परविरोधी तक्रारींवरून नगरसेविका पुत्रासह दोन्ही गटाच्या सुमारे ५० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मिरजेतील जवाहर चौकात एका अपार्टमेंटमध्ये बाहेरील तरुण वारंवार येत असल्याने तेथील रहिवाशाने त्यास मारहाण केली. यामुळे शंभर जणांच्या जमावाने तेथे धाव घेतली. दुसरा गटही समोरासमोर आल्यानंतर परस्परांवर दगड-विटांनी हल्ला चढविण्यात आला. काठ्या व बॅटने मारहाण करण्यात आली. यावेळी चौकात व रस्त्यावर थांबलेल्या दुचाकी व चारचाकी वाहनांचीही जमावाने मोडतोड केली.दोन्ही गटांकडून जोरदार दगडफेक व जमावाच्या दहशतीमुळे मोठा तणाव निर्माण झाला होता. याबाबत माहिती मिळाल्यानंतर शहर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संजीव झाडे, सहायक पोलिस निरीक्षक नितीन सावंत, सुशील मस्के, सचिन सनदी यांच्यासह पोलिस पथकाने घटनास्थळी धाव घेत लाठीमार करून जमावाला पिटाळले. पोलिसांच्या आक्रमक पवित्र्यामुळे जमाव पांगला.दगड, चपलांचा खचजवाहर चौक व गोठण गल्ली परिसरात दगड व चपलांचा खच पडला होता. पोलिसांनी दंगेखोरांची सुमारे २० दुचाकी वाहने ताब्यात घेतली. शहरात मोठ्या प्रमाणात दगडफेक करून दहशत निर्माण केल्यानंतरही दोन्ही गटांनी आपापसात तडजोडीचे धोरण स्वीकारल्याने मंगळवारी सायंकाळपर्यंत पोलिसांत फिर्याद दाखल झाली नव्हती. मात्र पोलिसांनी कठोर पवित्रा घेतल्यानंतर सलीम सय्यद व अस्लम काझी यांनी परस्परांविरुद्ध दंगल व मारामारीची फिर्याद दिली. त्यानुसार मिरजेतील राष्ट्रवादीच्या नगरसेविकेचा पुत्र आझम काझी याच्यासह दोन्ही गटाच्या सुमारे ५० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस