नागरिकांनी कोविशिल्ड लस नि:संकोच घ्यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:50 IST2021-03-04T04:50:59+5:302021-03-04T04:50:59+5:30

फोटो ओळ : विटा येथे ग्रामीण रुग्णालयात माजी आ. सदाशिवराव पाटील यांनी कोरोना लस घेतली. यावेळी डॉ. अविनाश लोखंडे, ...

Citizens should take Covishield vaccine without hesitation | नागरिकांनी कोविशिल्ड लस नि:संकोच घ्यावी

नागरिकांनी कोविशिल्ड लस नि:संकोच घ्यावी

फोटो ओळ : विटा येथे ग्रामीण रुग्णालयात माजी आ. सदाशिवराव पाटील यांनी कोरोना लस घेतली. यावेळी डॉ. अविनाश लोखंडे, डॉ. अनिल लोखंडे उपस्थित होते.

विटा : सांगली जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढताना दिसत आहेत. त्यामुळे स्वतःला या आजारापासून दूर ठेवण्यासाठी लस घेणे जरुरीचे आहे. सर्वच पात्र नागरिकांनी कोविशिल्ड ही शासन प्रमाणित तसेच सर्व परीक्षेत योग्य ठरलेली लस घेण्यासाठी नि:संकोच पुढे यावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी माजी आ. सदाशिवराव पाटील यांनी केले.

विटा येथील ग्रामीण रुग्णालयात कोविशिल्ड लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यास प्रारंभ झाला असून आतापर्यंत सुमारे एक हजार ४७९ नागरिकांना ही लस देण्यात आली. बुधवारी माजी आ. सदाशिवराव पाटील, अशोकराव गायकवाड यांच्यासह ६० वर्षांपेक्षा पुढील नगरसेवक आणि नागरिकांसाठी लसीकरण मोहीम राबविण्यात आली.

विटा ग्रामीण रुग्णालयात लस दिल्यानंतर माजी आ. पाटील म्हणाले, पोलिओ लसीवर आपण विश्वास ठेवला, त्यामुळे पोलिओ हद्दपार झाला. असाच विश्वास कोविशिल्ड या कोरोना प्रतिबंधक लसीवर ठेवा आणि कोरोनालासुद्धा हद्दपार करा. ही लस अधिक सुरक्षित व गुणकारी आहे.

मनमंदिर उद्योगसमूहाचे अध्यक्ष अशोकराव गायकवाड यांनी सपत्नीक, तर नगरसेवक किरण तारळेकर यांनीही कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेऊन जनजागृती केली. यावेळी डॉ. अनिल लोखंडे व डॉ. अविनाश लोखंडे यांच्यासह आरोग्य विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: Citizens should take Covishield vaccine without hesitation