नागरिकांनी स्वत:हून काेराेनाचे निर्बंध पाळावेत : अश्विनी पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:17 IST2021-07-05T04:17:17+5:302021-07-05T04:17:17+5:30
खानापूर : महाराष्ट्रात अजूनही कोरोनाचा प्रभाव कमी झालेला नाही. ग्रामीण भागातही गंभीर स्थिती आहे. लोकांनी लॉकडाऊन टाळण्यासाठी स्वतःहून निर्बंध ...

नागरिकांनी स्वत:हून काेराेनाचे निर्बंध पाळावेत : अश्विनी पाटील
खानापूर : महाराष्ट्रात अजूनही कोरोनाचा प्रभाव कमी झालेला नाही. ग्रामीण भागातही गंभीर स्थिती आहे. लोकांनी लॉकडाऊन टाळण्यासाठी स्वतःहून निर्बंध पाळले पाहिजेत, असे आवाहन खानापूर नगर पंचायतीच्या मुख्याधिकारी अश्विनी पाटील यांनी केले.
खानापूरमध्ये मुख्याधिकारी अश्विनी पाटील व वैद्यकीय अधिकारी विजय सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व दुकानदार, फळ, भाजी विक्रेते यांच्या ॲन्टिजेन चाचण्या त्यांच्या दुकानांमध्ये जाऊन करण्यात येत आहेत. यानिमित्ताने शहरात जनजागृती करण्यात येत आहे. यावेळी पाटील बाेलत हाेत्या. प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सहाय्यक जे. एन. गंबरे, डी. बी. पवार, एस. एच. यादव व नगरपालिका आरोग्य विभागाचे लिपिक आलम पिरजादे यांनी जोरदार मोहीम राबवली आहे. कोरोनाचे सर्व नियम पाळण्यासाठी मार्गदर्शन करण्यात येत आहे. पुढील दोन दिवसांमध्ये सर्व चाचण्या पूर्ण हाेतील, असे आरोग्य विभागाचे आलम पिरजादे यांनी सांगितले.
फोटो : ०४ खानापूर १
ओळ : खानापुरात प्रत्येक दुकानात जाऊन नगर पंचायत व आरोग्य विभागाचे कर्मचारी ॲन्टिजेन चाचणी करत आहेत.