शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

पाणी नाही नळाला, मतदान करायचे कशाला?; सांगलीतील नागरिकांचा सवाल 

By अविनाश कोळी | Updated: May 4, 2024 19:24 IST

सांगली : जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पिछाडीस हसनी आश्रम परिसरातील गजराज कॉलनीत गेल्या वीस दिवसांपासून पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. महापालिका स्तरावरुन ...

सांगली : जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पिछाडीस हसनी आश्रम परिसरातील गजराज कॉलनीत गेल्या वीस दिवसांपासून पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. महापालिका स्तरावरुन प्रश्नाची सोडवणूक न झाल्याने येथील नागरिकांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे.महापालिका प्रशासनाला शनिवारी येथील नागरिकांनी निवेदन दिले. या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या वीस दिवसांपासून परिसरात पाणी नाही. २६ व २८ एप्रिल रोजी सायंकाळी कमी दाबाने अपुरा पाणीपुरवठा झाला. गेल्या वीस दिवसांपासून पाण्याविना नागरिकांचे हाल होत आहेत. महापालिकेकडे तक्रार केल्यानंतरही त्याची दखल घेतली जात नाही. पाणीप्रश्न सुटत नसेल तर मतदान करायचे कशाला, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.आयुक्त शुभम गुप्ता यांच्याकडे फोन व मेसेजद्वारेही येथील नागरिकांनी तक्रार दाखल केली आहे. महापालिकेत निवेदन देताना हिंदुराव साळुंखे, असिफ मुरसल, अशोक कांबळे, अमृत खंडागळे, राजू शेख, मेहबुब मुल्ला, सलीम राजेवाले, सुनील सदामते, सिद्धू पाटील, गंगुबाई पाटील, पोर्णिमा फोंडे, सुवर्णा बागडी, दत्ता व्हनमाने, विजय व्हनमाने, नामदेव खंडागळे आदी उपस्थित होते.

एमआडीसीच्या लाईनमधून पाणीपुरवठाया भागास एमआयडीसीच्या चिंतामणराव महाविद्यालयाजवळील सहा इंची कनेक्शनद्वारे पाणी पुरवठा केला जातो. या भागात एकूण २१ गल्ल्या आहेत. सध्या इतर भागास एक दिवस आड नियमित पाणी सुरू आहे. उन्हाळ्यातील वाढत्या मागणीमुळे कमी प्रमाणात पाणीपुरवठा होत आहे. इतर भागांच्या तुलनेत चढावर असलेल्या गल्ल्यांमध्ये खूप कमी पाणी जात असल्याची बाब महापालिकेने मान्य केली.

महापालिका कर्मचाऱ्यांकडून पाहणीतक्रारीस अनुसरून भाग इन्स्पेक्टर, व्हॉल्वमन यांनी गजरात काॅलनीत पाहणी केली. एमआयडीसी व्यवस्थापनशी चर्चा करून त्यांच्या इतर मोठ्या व्यासाच्या लाईनचे पाणी काही काळासाठी बंद ठेवून शक्य तितका दाब वाढविणेचा प्रयत्न केला जाईल, आवश्यक जागी टँकरने पाणी देण्यात येईल, असे आश्वासन महापालिका प्रशासनाने दिले आहे.

टॅग्स :Sangliसांगलीsangli-pcसांगलीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Waterपाणी