बस्तवडेतील नागरिकांचे तासगावात उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:33 IST2021-07-07T04:33:09+5:302021-07-07T04:33:09+5:30
तासगाव : बस्तवडे (ता. तासगाव) येथील अंकुश पोपट शेळके यांच्या घरासमोरील सुस्थितीत असणारी गटार ग्रामपंचायतीने फोडली आहे. नवीन गटारीसाठी ...

बस्तवडेतील नागरिकांचे तासगावात उपोषण
तासगाव : बस्तवडे (ता. तासगाव) येथील अंकुश पोपट शेळके यांच्या घरासमोरील सुस्थितीत असणारी गटार ग्रामपंचायतीने फोडली आहे. नवीन गटारीसाठी कोणताही निधी उपलब्ध नसताना ग्रामपंचायतीने हा कारभार केला आहे. ही गटार फोडल्यामुळे येथील सांडपाणी रस्त्यावर येत आहे. परिणामी रोगराईला निमंत्रण मिळत आहे. त्यामुळे ग्रामपंचायत कारभाराविरोधात अंकुश शेळके यांनी तासगाव पंचायत समितीसमोर बेमुदत उपोषणास सुरुवात केली आहे.
काही महिन्यांपूर्वी ग्रामपंचायतीने अंकुश शेळके यांच्या घरासमोर सुस्थितीत असणारी गटार फोडली. त्यामुळे गटारीतून वाहणारे सांडपाणी रस्त्यावर पसरत आहे. गटारीतील घाण व सांडपाणी साचल्याने साथीचे रोग पसरण्याची शक्यता आहे. नवीन गटारीसाठी कोणताही निधी मंजूर नसताना ग्रामपंचायतीने हा उद्योग केल्याने अंकुश शेळके यांनी कामचुकार व बेजबाबदार ग्रामसेवकांवर कारवाई करावी. त्यांची इतरत्र बदली करावी. बेकायदेशीर मुजवलेली गटार उघडी करून सांडपाणी त्यामध्ये सोडावे, यासह अन्य मागणीसाठी अंकुश शेळके यांनी पंचायत समितीसमोर उपोषण केले. सभापती कमलताई पाटील यांच्या आश्वासनंतर उपोषण मागे घेण्यात आले.
फाेटाे : ०५ तासगाव १