चिंचणीतील चिमुरडीने खाऊचे पैसे दिले कोरोना रुग्णसेवेला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:35 IST2021-06-16T04:35:29+5:302021-06-16T04:35:29+5:30

फोटो ओळ : चिंचणी (ता. कडेगाव) येथील कुमारी अद्वैता महेश चव्हाण हिने विलगीकरण केंद्रातील स्वयंसेवक विक्रम महाडिक यांच्याकडे पैसे ...

Chimurdi from Chinchani paid for the meal at Corona Hospital | चिंचणीतील चिमुरडीने खाऊचे पैसे दिले कोरोना रुग्णसेवेला

चिंचणीतील चिमुरडीने खाऊचे पैसे दिले कोरोना रुग्णसेवेला

फोटो ओळ : चिंचणी (ता. कडेगाव) येथील कुमारी अद्वैता महेश चव्हाण हिने विलगीकरण केंद्रातील स्वयंसेवक विक्रम महाडिक यांच्याकडे पैसे साठवलेली मिनी बँक सुपूर्द केली.

कडेगाव :

कडेगाव तालुक्यातील चिंचणी येथील अद्वैता महेश चव्हाण (वय ८) या चिमुरडीने डॉ. पतंगराव कदम संस्थात्मक विलगीकरण केंद्रातील कोरोनाबाधित रुग्णांसाठी आर्थिक मदत देऊ केली आहे. आई-वडील व नातेवाइकांकडून वेळोवेळी खाऊसाठी मिळालेले पैसे मिनी बँकेत साठवून ५ हजार ५०० रुपयांची तिने ही मदत केली आहे.

चिंचणी येथील डॉ. महेश चव्हाण व डॉ. जयश्री चव्हाण हे दोघेही या विलगीकरण केंद्रात

रुग्णसेवा देतात. चिंचणी येथील विलगीकरण केंद्राचे स्वयंसेवक विक्रम महाडिक हे कोरोना रुग्णांसाठी औषधे आणण्यासाठी डॉ. महेश चव्हाण यांच्या रुग्णालयात गेले असताना कुमारी अद्वैता हिने तिची मिनी बँकच त्यांच्याकडे मोठ्या विश्वासाने सुपूर्द केली.

तिच्या या सामाजिक जाणिवेचे चिंचणी परिसरात चांगलेच कौतुक होत आहे. तिच्याकडून मिळालेल्या रकमेचा वापर कोरोनाबाधित रुग्णांच्या सेवेसाठी योग्य प्रकारे केला जाईल आणि येथे जमा झालेल्या प्रत्येक रुपयाचा हिशेब दिला जाईल, अशी ग्वाही विलगीकरण केंद्राच्या समितीने दिली आहे.

Web Title: Chimurdi from Chinchani paid for the meal at Corona Hospital