मतकुणकीत वादळी वाऱ्याने घेतला चिमुकलीचा जीव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2020 02:12 PM2020-05-20T14:12:12+5:302020-05-20T14:13:44+5:30

मतकुणकी (ता. तासगाव) येथे वादळी वाऱ्याने घरावरील पत्रे उडाले, त्यासोबत पत्र्याच्या अँगलला बांधलेला पाळणाही चिमुकल्या बाळासह उडून, चारशे फूट लांब जाऊन पडला. या दुर्घटनेत नंदिनी संजय शिरतोडे (वय ४ महिने) या बालिकेचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी सायंकाळी सहाच्या सुमारास घडली. बालिकेच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Chimukali's life was taken away by the storm in Matkunaki | मतकुणकीत वादळी वाऱ्याने घेतला चिमुकलीचा जीव

 मतकुणकी (ता. तासगाव) येथे वादळी वाऱ्याने घरावरील पत्रे उडाले. याच पत्र्याखाली चिमुकली दबली गेली.

Next
ठळक मुद्देमतकुणकीत वादळी वाऱ्याने घेतला चिमुकलीचा जीवपत्र्यासह पाळणा उडाला : परिसरात हळहळ

कवठेएकंद : मतकुणकी (ता. तासगाव) येथे वादळी वाऱ्याने घरावरील पत्रे उडाले, त्यासोबत पत्र्याच्या अँगलला बांधलेला पाळणाही चिमुकल्या बाळासह उडून, चारशे फूट लांब जाऊन पडला. या दुर्घटनेत नंदिनी संजय शिरतोडे (वय ४ महिने) या बालिकेचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी सायंकाळी सहाच्या सुमारास घडली. बालिकेच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मतकुणकीतील कवठेएकंद-चिंचणी रस्त्यानजीक विश्वनाथ शिरतोडे पत्नी, मुलगा, सून व तीन नाती यांच्यासह राहतात. त्यांचा मुलगा संजय यांना चार महिन्यांपूर्वी नंदिनी ही तिसरी मुलगी झाली होती.

सोमवारी सायंकाळी जोरदार वारे सुटले. त्यावेळी सर्वजण घरात होते. मात्र काही कळण्याच्या आतच जोरदार वारे घरात शिरले आणि घराचा पत्रा वाऱ्यासह उडून गेला. या पत्र्याच्या अँगलला दोरीने पाळणा बांधला होता. पाळण्यात नंदिनी होती. अँगल व पत्र्यासह पाळणा तब्बल चारशे फूट अंतरावर जाऊन पडला.

पाळणा पत्र्याखाली दबली गेल्याने नंदिनी गंभीर जखमी झाली होती. घरच्यांनी धावत जाऊन तिला उचलून घेतले व तात्काळ तासगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेले होते. पण तिची प्रकृती गंभीर असल्याने सांगलीतील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. पण रात्री साडेअकराच्या दरम्यान तिचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मंगळवारी घटनास्थळी आमदार सुमनताई पाटील, तहसीलदार कल्पना ढवळे, पंचायत समिती सभापती शुभांगी पाटील, मंडल अधिकारी प्रवीण माळवे, तलाठी लोणकर, सरपंच नेताजी पाटील, सजेर्राव पाटील, शिराज मुजावर आदींनी भेट दिली.

आईचा आक्रोश

वारे सुरू झाले तेव्हा चिमुकल्या नंदिनीला तिची आई नीता आपल्याकडे घेणार होती. तोपर्यंत वारे घरात घुसून काही कळण्याअगोदरच अँगल व छतासह पाळणा उडून गेला. छताखाली पाळणा दबला जाऊन चिमुकलीचा अंत झाला. घटनास्थळी आईचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. घरामध्ये सगळे असतानाही वादळापुढे हतबल व्हावे लागले आणि क्षणात चिमुकलीला गमवावे लागले.

Web Title: Chimukali's life was taken away by the storm in Matkunaki

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.