इस्लामपूर येथे शनिवारी चिमण डांगे यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 04:24 IST2020-12-24T04:24:47+5:302020-12-24T04:24:47+5:30

इस्लामपूर : महाराष्ट्र धनगर समाज महासंघाच्या प्रदेशाध्यक्षपदी माजी नगराध्यक्ष अ‍ॅड. चिमण डांगे यांची निवड झाल्याबद्दल वाळवा तालुक्यातील धनगर समाज ...

Chiman Dange felicitated at Islampur on Saturday | इस्लामपूर येथे शनिवारी चिमण डांगे यांचा सत्कार

इस्लामपूर येथे शनिवारी चिमण डांगे यांचा सत्कार

इस्लामपूर : महाराष्ट्र धनगर समाज महासंघाच्या प्रदेशाध्यक्षपदी माजी नगराध्यक्ष अ‍ॅड. चिमण डांगे यांची निवड झाल्याबद्दल वाळवा तालुक्यातील धनगर समाज बांधवांच्यावतीने शनिवारी (दि. २६) दुपारी दोन वाजता इस्लामपूर येथील लोकनेते राजारामबापू पाटील नाट्यगृहात जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती निमंत्रक शिवाजीराव वाटेगावकर, जिल्हा परिषदेचे सदस्य संभाजी कचरे यांनी दिली.

हा कार्यक्रम बांंधकाम, पशुसंवर्धन व सामान्य प्रशासन खात्याचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. यावेळी माजी ज्येष्ठ मंत्री अण्णासाहेब डांगे, आमदार अ‍ॅड. रामहरी रुपनवर हे प्रमुख उपस्थित राहणार आहेत. वाटेगावकर म्हणाले, अ‍ॅड. चिमण डांगे यांची धनगर समाज महासंघाच्या प्रदेशाध्यपदी निवड झाल्याने राज्यभर सर्वत्र धनगर समाज कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण झाले आहे. वाळवा तालुक्यातील सर्व गावांमध्ये सत्कार समारंभाच्या निमित्ताने संपर्क दौरा आयोजित करण्यात आला आहे. सुनील मलगुंडे, माजी सभापती सचिन हुलवान, प्रा.अरुण घोडके, किसन गावडे, अविनाश खरात, अ‍ॅड. उमेश कोळेकर, बाबासाहेब सिद्ध, प्रकाश कनप, अजित ऐडगे, बजरंग कदम, नामदेव मदने, शिवाजीराव डांगे, चंद्रशेखर तांदळे संयोजन करीत आहेत.

फाेटाे : २३१२२०२०-आयएसएलएम-अ‍ॅड. चिमण डांगे

Web Title: Chiman Dange felicitated at Islampur on Saturday