तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेत चिखली ग्रामपंचायतीची बाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:27 IST2021-04-07T04:27:30+5:302021-04-07T04:27:30+5:30

सांगली : संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेत चिखली (ता. शिराळा ) ग्रामपंचायतीने बाजी मारली. ...

Chikhali Gram Panchayat wins Tukdoji Maharaj Clean Village Competition | तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेत चिखली ग्रामपंचायतीची बाजी

तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेत चिखली ग्रामपंचायतीची बाजी

सांगली : संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेत चिखली (ता. शिराळा ) ग्रामपंचायतीने बाजी मारली. या जिल्हास्तरीय स्पर्धेत ६० जिल्हा परिषद मतदारसंघातील ६० ग्रामपंचायतींची तपासणी करण्यात आली होती. जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विजयसिंह जाधव यांनी ही माहिती दिली.

निकाल असा : प्रथम बक्षीस पाच लाख रुपये- चिखली (ता. शिराळा), व्दितीय पुरस्कार तीन लाख रुपये - कुंडल (ता. पलूस) व कवठेपिरान (ता. मिरज) विभागून. तृतीय पुरस्कार दोन लाख रुपये - शिरगाव कवठे (ता.तासगाव) व कुकटोळी (ता. कवठेमहांकाळ) विभागून.

विशेष पुरस्कार २५ हजार रुपये प्राप्त ग्रामपंचायती - स्व. वसंतराव नाईक पुरस्कार (सांडपाणी व्यवस्थापन) - बामणी (ता. खानापूर), डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार (पाणी गुणवत्ता व पाणी व्यवस्थापन) - साखराळे (ता. वाळवा), स्व. आबासाहेब खेडकर पुरस्कार (शौचालय व्यवस्थापन) - शिरगाव (ता. कडेगाव).

स्पर्धेसाठी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समिती नियुक्त करण्यात आली होती. तिच्यामार्फत जिल्हास्तरीय तपासणी प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.

-----------------

Web Title: Chikhali Gram Panchayat wins Tukdoji Maharaj Clean Village Competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.