शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्य तळपतोय! उष्णतेचा प्रकोप ठरतोय जीवघेणा; उत्तर प्रदेशमध्ये ३३ जणांचा मृत्यू
2
एमएचटी-सीईटीचा निकाल जाहीर: ३७ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाईल; यंदा नऊ अधिक
3
Weather Forecast: पावसाबाबत महत्त्वाची बातमी: कोकण, मराठवाड्यात यलो अलर्ट; असा आहे हवामान अंदाज
4
ईव्हीएमवरून गदारोळ; इलॉन मस्क यांनी व्यक्त केली चिंता; भारताच्या निवडणूक आयुक्तांनी काय उत्तर दिलं?
5
आजचे राशीभविष्य, १७ जून २०२४ : कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील, मानसिक स्वास्थ्य लाभेल
6
आइस्क्रीममध्ये मानवी बोट; उत्पादन करणाऱ्या डेअरीला अखेर FDAचा दणका
7
नवीन मालिका सुरु होत असताना शिवानी सुर्वेने चाहत्यांना केलं आवाहन, म्हणाली - "१२ वर्षांपुर्वी..."
8
निवृत्तीचे वय ६० करण्यास राज्य सरकार सकारात्मक
9
Upcoming IPOs: पैसे तयार ठेवा! या आठवड्यात उघडणार ३ नवे आयपीओ, पाहा संपूर्ण डिटेल्स
10
संयुक्त पत्रकार परिषदेनंतर आता तीनही पक्षांची चाचपणी सुरू; विधानसभा जागावाटपाचा 'असा' असेल फॉर्म्युला
11
आजचा अग्रलेख: विधानसभेसाठी ‘स्मार्ट’ खेळी
12
अण्णासाहेब पाटील महामंडळातील ६१ कर्मचाऱ्यांना कामावरून काढले
13
नीटची संस्था ‘नीट’ करणार; घोळ करणाऱ्यांना सोडणार नाही: सरकार उचलणार कठाेर पाऊल
14
यू-ट्यूब व्हिडीओद्वारे सलमानला धमकावणाऱ्याला राजस्थानातून अटक
15
विशेष लेख: ‘नीट’ परीक्षेतील ‘नटवरलाल’ नक्की कोण?
16
शहरी नक्षलवाद्यांची एनजीओंमध्ये घुसखोरी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका
17
होर्डिंग दुर्घटनेतील आरोपींच्या कोठडीत वाढ
18
दफन केलेले मुलाचे प्रेतच गायब; दिसला फक्त खड्डा!
19
रवींद्र वायकरांच्या मतदारसंघातील मतमोजणीवरून वादंग; निवडणूक आयोगाने EVMबाबत दिलं 'हे' स्पष्टीकरण
20
ताजा विषय: शिक्षकांना मोठा पगार मिळाला तर पोटात का दुखते?

मुख्याधिकारीसाहेब, भानगडी बाहेर काढाच! ; भानगडबाज कारभारावर शिक्कामोर्तब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2019 12:33 AM

बेकायदा कामांवर कोट्यवधी रुपयांचा चुराडा होत असताना, केवळ सत्ताधारी कारभारीच याला जबाबदार होते, अशी परिस्थिती नव्हती. अधिकाºयांना हाताशी धरून विकासाच्या गोंडस नावाखाली भ्रष्ट कारभार बोकाळला होता. विरोधी राष्टÑवादीच्या सदस्यांनी अकांडतांडव करूनदेखील भ्रष्ट कारभाराचे सर्व कारनामे दडपून ठेवण्यात आले होते.

ठळक मुद्देतासगावच्या जनतेची अपेक्षा : सत्ताधारी-अधिकाऱ्यांमधील वाद उफाळला

दत्ता पाटील ।तासगाव : तासगाव नगरपालिकेची दोन दिवसांपूर्वी अभूतपूर्व सभा झाली. कधी नव्हे ते पहिल्यांदाच प्रशासन आणि कारभारी एकमेकांविरोधात उभे ठाकले. कारभाऱ्यांनी प्रशासनावर हल्लाबोल करून भ्रष्ट कारभारावर आसूड ओढला. त्यानंतर संतप्त झालेल्या मुख्याधिकाºयांनीदेखील, भानगडी बाहेर काढण्याचा इशारा दिला. एकमेकांच्या भानगडीमुळे पालिकेतील भानगडबाज कारभारावर शिक्कामोर्तब झाले. आता मुख्याधिकाºयांनी कोणाचीही भीडभाड न ठेवता भानगडी चव्हाट्यावर आणाव्यात, अशी मागणी तासगावकरांकडून होत आहे.

तासगाव नगरपालिकेत भाजपची एकहाती सत्ता आल्यानंतर खासदार संजयकाका पाटील यांनी शासनाकडून कोट्यवधी रूपयांचा निधी आणून विकासाची गंगा वाहती ठेवण्याचा प्रयत्न केला. नेमके याच वाहत्या गंगेत सत्ताधा-यांनी हात धुऊन घेण्याचे अनेक कारनामे केले. काही कारभाºयांनी स्वत:च ठेकेदारी सुरु केली. काहींनी ठेकेदारांना पोसण्याचे उद्योग केले. जादा दराच्या निविदा, बेकायदा आणि बोगस कामे, निकृष्ट दर्जाची कामे, अशा एक ना अनेक कामांचा पायंडाच सत्ताधा-यांनी सुरु केला होता.

बेकायदा कामांवर कोट्यवधी रुपयांचा चुराडा होत असताना, केवळ सत्ताधारी कारभारीच याला जबाबदार होते, अशी परिस्थिती नव्हती. अधिकाºयांना हाताशी धरून विकासाच्या गोंडस नावाखाली भ्रष्ट कारभार बोकाळला होता. विरोधी राष्टवादीच्या सदस्यांनी अकांडतांडव करूनदेखील भ्रष्ट कारभाराचे सर्व कारनामे दडपून ठेवण्यात आले होते. सत्ताधारी आणि अधिकाºयांचा हम करे सो कायदा, याप्रमाणेच कारभार सुरु होता. किंंबहुना अनेक बेकायदा कामे नियमात बसवून करण्याची नामी शक्कल लढवण्यात आली होती. त्यामुळे गेल्या दोन-तीन वर्षात भ्रष्टाचाराचे आरोप होऊनही ना सत्ताधा-यांनी खदखद केली, ना प्रशासनाने आक्षेप केला. मिळून सारे जण... असाच सर्व रागरंग होता.

मात्र काही महिन्यांपासून पालिकेच्या कारभारात बदल होत होता. तत्कालीन मुख्याधिकाºयांची फ्री हॅन्ड कामाची पध्दत सत्ताधाºयांच्या पथ्थ्यावर पडणारी होती. मात्र नव्याने आलेले मुख्याधिकारी गणेश शिंदे यांच्या कारकीर्दीत नियमांची सांगड घालून काम करण्यास सुरुवात झाली. इथूनच पालिकेच्या कारभाराला कलाटणी मिळाली.गेल्या दोन-तीन वर्षांपासून सुरु असलेल्या बेलगाम कारभाराला मुख्याधिकारी शिंंदे यांनी लगाम लावला. त्यामुळे कारभा-यांच्या मनमानीला चाप बसला. मुख्याधिकारी जुमानत नाहीत म्हटल्यावर आतापर्यंत सत्ताधा-यांनीच भ्रष्टाचाराविरोधात गरळ ओकण्यास सुरुवात केली. प्रशासनातील अधिकारी भ्रष्ट असल्याचा आरोप केला. या आरोपांच्या फैरींनी संतप्त झालेल्या मुख्याधिकाºयांनी नगरसेवकांना ‘तुमच्या भानगडी बाहेर काढू’ असा सज्जड इशाराच भर सभेत देऊन टाकला.मुख्याधिकाºयांच्या वक्तव्याने पालिकेत भानगडी आहेत, यावर शिक्कामोर्तब झालेच. मुळातच पालिकेचा कारभार भानगडबाज असल्याचे अनेकदा चव्हाट्यावर आले होते. मात्र सत्ताधारी आणि प्रशासनाचे अंडरस्टॅँडिंग असल्याने या कारभाराची चिरफाड झाली नाही. मात्र मुख्याधिकारी शिंंदे यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतरच, पालिकेतील स्वच्छतेच्या ठेक्याची बोगस कागदपत्रे बाहेर पडली. त्यापूर्वी अशा बेकायदा कामाचा एकही कागद जनतेसमारे आला नाही.मात्र आता मुख्याधिकारी शिंंदे यांनी चॅलेंज केलेच आहे, तर भानगडी चव्हाट्यावर काढाव्यात, अशी अपेक्षा जनतेतून व्यक्त होत आहे.

जनतेच्या पैशावर डल्ला मारणारे कारभारी असोत अथवा प्रशासनातील अधिकारी असोत, त्यांच्यावर कारवाई व्हायलाच पाहिजे. जनतेच्या हितासाठी नगरसेवकांनी अधिकाºयांच्या भानगडी बाहेर काढाव्यात, नाही तर अधिकाºयांनी कारभाºयांच्या भानगडी बाहेर काढाव्यात. नेमक्या भानगडी जनतेसमोर आल्याशिवाय भानगडबाज पालिकेतील नेमक्या भानगडी कोणी केल्या, हे चव्हाट्यावर येणार नाही.

 

  • राज्यात हवा बदलल्याने सदस्य आक्रमक

तासगाव नगरपालिकेत भाजपची सत्ता आहे. यापूर्वी राज्यातील सत्तेची सूत्रे भाजपकडेच होती. त्यामुळे सत्ताधाऱ्यांच्या कारभाराला वरूनच वरदहस्त होता. मात्र आता राज्यात सत्ताबदल झाल्यामुळे, नगरपालिकेतही हवाबदल झाल्याचे दिसून येत आहे. यापूर्वी राष्टÑवादीचा आवाज दबला जात होता. मात्र राज्यात सत्तेत आल्याने राष्टÑवादीचे नगरसेवकही चांगलेच आक्रमक झाले आहेत. कदाचित या हवा बदलामुळेच पालिकेत प्रशासनाचा आवाज देखील दबला जात नसल्याचे बोलले जात आहे.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसGovernmentसरकारMuncipal Corporationनगर पालिका