तासगाव : जाती निर्मूलनासाठी संघर्ष करून सामाजिक समता प्रस्थापित करणारे लोककल्याणकारी राजा म्हणून छत्रपती शाहू महाराजांची ओळख आहे, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. मिलिंद हुजरे यांनी केले.
तासगाव येथील पद्मभूषण डॉ. वसंतरावदादा पाटील महाविद्यालयात शाहू जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. ते म्हणाले की, शिक्षण, उद्योग, शेती, कला, क्रीडा या सर्वच क्षेत्रात चौफेर कामगिरी करून शाहू महाराजांनी समाजसुधारणेची क्रांती घडवून आणली. शाहू महाराजांनी संस्थानातील नोकऱ्यामध्ये मागासलेल्या जाती-जमातीसाठी ५० टक्के जागा राखीव ठेवण्याचा क्रांतिकारी निर्णय घेऊन अंमलात आणला.
इतिहास विभागाने शाहू जयंतीचे औचित्य साधून प्रश्नमंजुषाचे आयोजन केले होते. प्रा. एस. जे. पाटील यांनी प्रास्ताविक केले. प्रा. डी. वाय. साखरे यांनी आभार मानले. डॉ. अर्जुन वाघ यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी प्रा. आर. बी. मानकर, प्रा. ए. के. पाटील, डॉ. टी. के. बदामे, प्रा. जे. ए. यादव, डॉ. हाजी नदाफ, प्रा. सुनील गावित, दिलीप सुवासे आदी उपस्थित होते.