छत्रपती संभाजी महाराज तरुणांसाठी आदर्श
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:23 IST2021-02-15T04:23:42+5:302021-02-15T04:23:42+5:30
ऐतवडे खुर्द (ता. वाळवा) येथे बुद्धीविकास वाचनालय व वारणा महाविद्यालय यांच्या वतीने आयोजित कै. प्रकाश पाटील दादा यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ...

छत्रपती संभाजी महाराज तरुणांसाठी आदर्श
ऐतवडे खुर्द (ता. वाळवा) येथे बुद्धीविकास वाचनालय व वारणा महाविद्यालय यांच्या वतीने आयोजित कै. प्रकाश पाटील दादा यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ बापूजी व्याख्यानमालेअंतर्गत तिसरे पुष्प गुंफताना ते बोलत होते.
‘छत्रपती संभाजी महाराज एक आदर्श व्यक्तिमत्त्व’ याविषयी मार्गदर्शन करताना डॉ. कांबळे म्हणाले, छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास संघर्षमय होता. जन्मापासून ते मृत्यूपर्यंत त्यांनी अनेक संकटांचा सामना केला. त्यांनी एकाच वेळी घरभेदी, मुगल, परकीय सत्ता यांना यशस्वीपणे तोंड दिले. छत्रपती संभाजी महाराज मुत्सद्दी, युद्धवीर होतेच त्याचबरोबर उत्तम साहित्यिक देखील होते. संस्कृत, ब्रज, हिंदी, भाषेमध्ये विशेष पारंगत होते, असेही मत त्यांनी व्यक्त केले.
राज्य सहकारी संघाचे अध्यक्ष डॉ. प्रताप पाटील यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर मराठ्यांच्या एका पर्वाचा अंत झाला, अशी खंत मत व्यक्त केली. यावेळी वारणा शिक्षण संस्थेचे खजिनदार बाबासाहेब पाटील, शिवराज विद्यालयाचे मुख्याध्यापक जे. आर. शेटे, बुद्धीविकास वाचनालयाचे संचालक बाळासाहेब पवार, प्रा. अमित पाटील, बुद्धीविकास वाचनालयाचे ग्रंथपाल धनाजी लाड उपस्थित होते. प्रा. सुवर्णा आवटे यांनी सूत्रसंचालन केले. बुद्धीविकास वाचनालयाचे अध्यक्ष बी. बी. पाटील यांनी मानले मानले.
फोटो-१४कुरळप१
फोटो- ऐतवडे खुर्द (ता. वाळवा) येथे बापूजी व्याख्यानमालेत प्रा. डॉ. प्रदीप कांबळे यांनी मार्गदर्शन केले.