शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांची सरकारमधून बाहेर पडण्याची तयारी?; 'वर्षा'वरील बैठकीत दादा संतापले, दानवेंचा दावा
2
डॉ. मुजम्मिलच्या डायरीतून समोर आलं मोठं गुपित, 'कोड वर्ड'मध्ये लिहिला होता दहशतीचा प्लॅन! आणखी 25 नावं समोर
3
आधीच BCCIची रोहित शर्माला 'वॉर्निंग'; त्यात आता MCAच्या 'त्या' विधानाने वाढवलं 'टेन्शन'
4
Groww Share Price Today : Groww च्या शेअर्सची दुसऱ्या दिवशीही जोरदार घोडदौड! गुंतवणूकदारांना ५०% हून अधिक फायदा, केलं मालामाल
5
दहशतवाद्यांसाठी काळ बनून आले 'हे' IPS अधिकारी; एका पोस्टरवरुन केला मोठ्या कटाचा खुलासा
6
दिल्ली स्फोटाची भीषणता! लाल किल्ल्यापासून ३०० मीटर दूर दुकानाच्या छतावर सापडला मानवी हात; मृतांचा आकडा १३ वर
7
पाकिस्तानची अफगाणिस्तान अन् भारताला पोकळ धमकी; एकाचवेळी युद्ध करण्याची क्षमता आहे किती?
8
SIP द्वारे कोट्यधीश व्हायचंय? '१०-७-१०' हा फॉर्म्युला येईल कामी; श्रीमंत होण्यापासून कोणीही थांबवू शकणार नाही
9
पार्थ पवारांच्या कंपनीला सूट द्यायची आहे का? बावनकुळेंच्या प्रश्नामुळे मुद्रांक शुल्क विभागच संभ्रमात
10
खळबळजनक! लेकाला PUBG चं व्यसन, कंटाळलेल्या आईने अखेर संपवलं जीवन, वडील म्हणतात...
11
CM देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे एकाच मंचावर येणार; दोघांची भेट लक्षवेधी ठरणार
12
तहसीलदार पदावरून ४ वेळा निलंबन; ‘कामाची’ सवय असलेले सूर्यकांत येवले लाच प्रकरणांतही आघाडीवर
13
सोशल मीडियावर रातोरात व्हायरल झाली गिरीजा ओक, पहिल्यांदाच प्रतिक्रिया देत म्हणाली...
14
दिल्लीत स्फोटापूर्वी मशिदीत गेला होता दहशतवादी डॉ. उमर नबी; स्फोटाच्या आधीचे सीसीटीव्ही समोर
15
अल-कायदाचा माजी कमांडर; व्हाईट हाऊसमध्ये अल-शरा आणि डोनाल्ड ट्रम्प यांची ऐतिहासिक भेट
16
“बूट फेकीसारख्या घटना पुन्हा घडू नये यासाठी काय उपाय करता येईल?”; सुप्रीम कोर्टाचा सवाल
17
कर्तव्यनिष्ठेला सलाम! कुशीत बाळ अन् हातात मशीन... आई करतेय कंडक्टरचं काम; 'ती'चा संघर्ष
18
'या' सरकारी बँकेचा ग्राहकांना मोठा दिलासा; घर घेण्याच्या विचारात असाल तर, पाहा काय आहेत नवे दर?
19
Delhi Blast : व्हाईट कॉलर टेरर मॉड्यूल! दिल्ली स्फोट प्रकरणात आणखी एका डॉक्टरला घेतलं ताब्यात
20
Delhi Blast: दिल्ली बॉम्बस्फोटातील कारची ११ वर्षात ५ वेळा विक्री; खरा मालक कोण, शेवटचा व्यवहार कधी झाला?

चुडेखिंडीतील चारा छावणी ठरतेय पशुधनासाठी तारणहार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2019 13:04 IST

कवठेमहांकाळ तालुका तसा दुष्काळीच. गेल्या एक दोन वर्षात अल्प पावसामुळे तालुक्यात सध्या दुष्काळस्थिती आहे. तालुक्यातील सर्व गावांमध्ये गंभीर स्वरूपाचा दुष्काळ घोषित करण्यात आला आहे. या टंचाईपरिस्थितीवर मात करण्यासाठी शासन आणि प्रशासन यांच्यामार्फत विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. यामध्ये चुडेखिंडी येथे उभारलेली चारा छावणी चुडेखिंडीसह परिसरातील 5 किलोमीटर अंतरामधील जांभुळणी आणि चोरोची या गावामधील पशुधनासाठी तारणहार ठरली आहे.

ठळक मुद्देचुडेखिंडीतील चारा छावणी ठरतेय पशुधनासाठी तारणहार!जांभुळणी आणि चोरोची गावांना लाभ

सांगली  : कवठेमहांकाळ तालुका तसा दुष्काळीच. गेल्या एक दोन वर्षात अल्प पावसामुळे तालुक्यात सध्या दुष्काळस्थिती आहे. तालुक्यातील सर्व गावांमध्ये गंभीर स्वरूपाचा दुष्काळ घोषित करण्यात आला आहे. या टंचाईपरिस्थितीवर मात करण्यासाठी शासन आणि प्रशासन यांच्यामार्फत विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. यामध्ये चुडेखिंडी येथे उभारलेली चारा छावणी चुडेखिंडीसह परिसरातील 5 किलोमीटर अंतरामधील जांभुळणी आणि चोरोची या गावामधील पशुधनासाठी तारणहार ठरली आहे.या दुष्काळी टापूत दुग्ध व्यवसाय हे प्रमुख उत्पन्नाचे साधन आहे. गेली दीड वर्षे पाऊस नसल्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर होता. अशा स्थितीत पशुधन वाचवण्याचे मोठे आव्हान होते. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दुष्काळी उपाययोजनांबाबतच्या सूचनेनुसार जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय अधिकारी डॉ. विकास खरात यांच्या पुढाकाराखाली तहसीलदार शिल्पा ठोकडे यांनी चारा छावणी उभारण्यासाठी सेवाभावी संस्थांना आवाहन केले.

त्याला चुडेखिंडीच्या लोकनेते जयसिंग तात्या शेंडगे बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेने सकारात्मक प्रतिसाद देत अक्षयतृतीयेला म्हणजेच 7 तारखेला चारा छावणी सुरू केली. पहिल्याच दिवशी 324 जनावरे छावणीमध्ये दाखल झाली. छावणीत 13 मे अखेर 836 जनावरे असून, ही संख्या आणखी वाढत आहे.याबाबत चारा छावणी चालक बापू संभा पाटील म्हणाले, शासनाच्या आदेशाप्रमाणे मोठ्या जनावरांना 18 किलो व लहान जनावरांना 9 किलो चारा वाटप व चांगल्या प्रकारचे पाणी उपलब्ध करून दिले जात आहे. तसेच, मोठ्या जनावरांना 1 किलो पशुखाद्य व लहान जनावरांना अर्धा किलो पशुखाद्य असे आठवड्यातून तीन वेळा वाटप चालू आहे. या चारा छावणीचा चुडेखिंडी, जांभूळवाडी आणि चोरोची या तिन्ही गावांना चांगला लाभ होत आहे.पशुपालक समिती सदस्य जगन्नाथ संत्राम पाटील म्हणाले, चारा, पाणी वाटपावर पशुपालक समिती लक्ष ठेवून आहे. या छावणीमुळे दुष्काळ भागातील जनावरे वाचली आहेत. लाभार्थी हिराबाई भुसनर म्हणाल्या, चारा छावणी सुरू झाल्यामुळे जनावरांची सोय झाली आहे. आमची पाच जनावरे या छावणीत आहेत. जनावरांना चारा वाटप व पाणी चांगले मिळते याबद्ल त्यांनी समाधान व्यक्त केले.लाभार्थी विजय संगाप्पा शितोळे म्हणाले, संस्था अतिशय व्यवस्थितरित्या चारा, पाणी, उच्च प्रतीचे पशुखाद्य देण्याचे काम करत आहे. फक्त छावणी म्हणून नाही तर सामाजिक बांधिलकी म्हणून संस्थेने काम केले आहे. ग्रामपंचायतीने पिण्याच्या पाण्याची सोय करून दिली आहे. शिवाय प्रशासनातर्फे पशु विभाग जनावरांची तपासणी व आरोग्य विभाग जनावरांबरोबर राहिलेल्या लोकांची तपासणी वेळोवेळी येवून करतात. एकूणच कवठेमहांकाळ तालुक्यातील नागरिकांना दिलासा देण्यासाठी प्रशासनाने उचललेल्या या पावलाबद्दल समाधान व्यक्त केले जात आहे.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीSangliसांगली