शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत पॉलिशच्या बहाण्याने चक्क सोने वितळवून फसवले

By घनशाम नवाथे | Updated: August 17, 2024 19:26 IST

साडेपाच तोळ्यांपैकी निम्मेच सोने शिल्लक

सांगली : येथील पंचशीलनगरमध्ये भामट्यांनी पॉलिशच्या बहाण्यानंतर फसवताना पकडले जाऊ नये म्हणून चक्क निम्मे सोनेच वितळवून घेऊन पलायन केल्याचा प्रकार घडला. या प्रकारानंतर साडेपाच तोळ्यांच्या सोन्याच्या बांगड्यांमधून पावणेतीन तोळेच बांगड्या शिल्लक राहिल्या. वजनातील घट पाहून वंदना नामदेव मोहिते (वय ५८, रा. भिसे प्लॉट, पंचशीलनगर) यांना फसवल्याचे लक्षात येताच त्यांनी संजयनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

अधिक माहिती अशी, सोने पॉलिशच्या बहाण्याने घरासमोर येणारे भामटे रंगीत पाण्यामध्ये सोने ठेवल्याचे सांगून पळून जातात. थोड्या वेळाने सोने बाहेर काढण्यास सांगितल्यामुळे नंतर रंगीत पाण्यात बघितल्यानंतर हातचलाखीने सोने लंपास केल्याचे निदर्शनास येते. बऱ्याच जणांना हा फसवणुकीचा फंडा माहीत झाला आहे. त्यामुळे चोरट्यांनी फसवण्याची नवीनच शक्कल लढवल्याचा प्रकार पंचशीलनगरमधील घटनेतून उघड झाला.पंचशीलनगर येथील वंदना मोहिते या दि. १६ रोजी सकाळी ११:३० वाजता घरात होत्या. तेव्हा भामटे त्यांच्या दारात आले. त्यांनी सोने पॉलिश करून देतो, अशी त्यांना भुरळ घातली. मोहिते यांनी त्यांच्याकडील साडेपाच तोळ्याच्या सोन्याच्या बांगड्या दोघांकडे दिल्या. दोघांनी वेगवेगळ्या प्रक्रिया करत असल्याचे त्यांना भासवले. या प्रकारात त्यांनी ‘लिक्विड’ तापवून सोन्याच्या बांगड्यांतील निम्मा भाग वितळवून घेतला. काही वेळाने चकाचक सोन्याच्या बांगड्या मोहिते यांच्या हातात देऊन भामट्यांनी काढता पाय घेतला.

मोहिते यांनी हातात बांगड्या घेऊन पाहताना त्या वजनाला हलक्या लागल्या. निरखून पाहिल्यानंतर चार बांगड्या पातळ होऊन तुटल्या. तेव्हा त्यांना चोरट्यांनी सोन्याचा अंश वितळवून घेतल्याचे समजले. त्यांनी तातडीने बाहेर जाऊन पाहणी केली; परंतु चोरटे केव्हाच पसार झाले होते. त्यांनी संजयनगर पोलिस ठाणे गाठून ९० हजारांचे सोने वितळवून घेऊन फसवणूक केल्याची फिर्याद नोंदवली. दोघा भामट्यांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

चोरट्यांची नवी ‘मोडस’पॉलिशच्या बहाण्याने सगळेच सोने घेऊन पलायन करणे धोक्याचे असते; त्यामुळे सोन्याचा थोडा अंश घेऊन फसवण्याचा नवा फंडा भामट्यांनी शोधला आहे. ही गुन्हे करण्याची नवी ‘मोडस’ असल्याचे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :SangliसांगलीGoldसोनंCrime Newsगुन्हेगारी