मिरज (जि.सांगली) : मिरजेत टाकळी रोड येथे बाळकृष्ण अनिल शिंदे (वय २६, रा. टाकळी रोड, मिरज) या नवविवाहित प्राध्यापकाने राहत्या घरी गळफास घेऊन गुरुवारी आत्महत्या केली. आत्महत्येचे निश्चित कारण समजले नाही.टाकळी रोड येथील बाळकृष्ण शिंदे हे मिरज महाविद्यालयात तासिका तत्त्वावर साहाय्यक प्राध्यापक म्हणून काम करीत होते. दोन महिन्यांपूर्वी त्यांचा विवाह झाला होता. गुरुवारी रात्री त्यांनी राहत्या घरी गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. नातेवाईकांनी त्यांना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. मिरज शहर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी मिरज शासकीय रुग्णालयात पाठविला. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही.
Sangli: मिरजेत सीएचबी प्राध्यापकाने गळफास घेत संपवले जीवन, कारण अस्पष्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2025 14:30 IST