कोयना व गोंदिया एक्स्प्रेसच्या वेळेत बदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2020 04:24 IST2020-12-08T04:24:18+5:302020-12-08T04:24:18+5:30

कोल्हापूर-मुुंबई कोयना एक्स्प्रेस कोल्हापूर येथून सकाळी ८ वाजून ४० मिनिटांनी सुटेल. मिरजेत ९ वाजून २० मिनिटांनी, तर सांगलीत ९ ...

Changes in the timing of Koyna and Gondia Express | कोयना व गोंदिया एक्स्प्रेसच्या वेळेत बदल

कोयना व गोंदिया एक्स्प्रेसच्या वेळेत बदल

कोल्हापूर-मुुंबई कोयना एक्स्प्रेस कोल्हापूर येथून सकाळी ८ वाजून ४० मिनिटांनी सुटेल. मिरजेत ९ वाजून २० मिनिटांनी, तर सांगलीत ९ वाजून ३५ मिनिटांनी येईल. पुणे येथे दुपारी ३ वाजून ५० वाजता पोहोचेल, तर मुंबई येथे रात्री ९ वाजून ५ मिनिटांनी पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही गाडी मुंबई येथून सकाळी ९ वाजून ४० मिनिटांनी सुटेल. ही गाडी सांगलीत सायंकाळी ६ वाजून २० मिनिटांनी, तर मिरजेत ६ वाजून ५० मिनिटांनी येईल, तर कोल्हापूर येथे रात्री ९ वाजता पोहोचेल.

कोल्हापूर-गोंदिया महाराष्ट्र एक्स्प्रेस कोल्हापूर येथून दुपारी २ वाजून ४५ मिनिटांनी सुटेल. ही गाडी मिरजेत दुपारी ३ वाजून ३० मिनिटांनी, सांगलीत ४ वाजून ५ मिनिटांनी येईल. पुण्यात रात्री १० वाजून २५ मिनिटांनी पोहोचेल, तर दुसर्‍यादिवशी सायंकाळी ६ वाजता गोंदिया येथे पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही गाडी गोंदिया येथून सकाळी ८ वाजून १५ मिनिटांनी सुटेल. ही गाडी पुण्यात पहाटे ४ वाजून २० मिनिटांनी, सांगलीत सकाळी १० वाजून २० मिनिटांनी, तर मिरजेत १० वाजून ४५ मिनिटांनी येईल. ही गाडी कोल्हापूर येथे दुपारी १२ वाजून २५ मिनिटांनी पोहोचेल. दि.१ पासून वेळेत बदल करण्यात आला आहे.

Web Title: Changes in the timing of Koyna and Gondia Express