शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
4
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
5
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
6
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
7
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
8
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
9
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
10
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
11
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
12
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
13
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
14
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
15
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
16
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
17
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
18
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
19
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
20
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे

फसवणुकीसाठी आता ‘चारसो बीस’ नव्हे तर..; १ जुलैपासून कायद्यातील कलमांमध्ये बदल, नवी कलमे जाणून घ्या

By घनशाम नवाथे | Updated: June 21, 2024 18:22 IST

पोलिसांसह वकील मंडळींना पुन्हा अभ्यास करावा लागणार

घनश्याम नवाथेसांगली : ‘अरे त्या ३०२ चा तपास कुठपर्यंत आलाय?’ आणि ‘त्या ४२० च्या गुन्ह्यात पुढे काय झालं? आरोपी पकडला काय?’ अशा पोलिस ठाण्यात कानावर पडणाऱ्या संवादामुळे अनेकांना कायद्याची कलमे पाठ झाली होती. परंतु, आता १ जुलैपासून नवीन कलमे कानावर पडणार आहेत. नवीन कलमे पाठ करण्यासाठी पोलिसांसह वकील मंडळींना पुन्हा अभ्यास करावा लागतोय. सराईत गुन्हेगारांनाही अनेक कलमे पाठ आहेत, त्यांनाही नव्या कलमांची उजळणी करावी लागणार आहे.ब्रिटिशांपासून भारतीय दंड विधान, फौजदारी प्रक्रिया संहिता आणि भारतीय पुरावा कायदा यांची आतापर्यंत अंमलबजावणी सुरू होती. परंतु, हे तीन प्रमुख कायदे बदलण्यात आले आहेत. १ जुलैपासून नवीन कायदे लागू होणार आहेत. वेगवेगळ्या गुन्ह्यांसाठी लावले जाणारे कायद्याचे कलमही आता बदलले जाणार आहे. तसेच नवीन काही गुन्हेही समाविष्ट करण्यात आले आहेत.भारतीय दंड विधानमध्ये पूर्वी ५११ कलमे होती, आता नव्या भारतीय न्याय संहितेमध्ये ३५८ कलमे आहेत. यात नवीन कायद्यात २१ गुन्ह्यांची भर पडली आहे. फौजदारी प्रक्रिया संहितामध्ये ५३१ विभाग आहेत. नवीन कायद्यात १७७ कलमे बदलली आहेत. नवीन ९ कलमे वाढवली आहेत. तर १४ कलमे रद्द केली आहेत. भारतीय पुरावा कायद्यात आता १७० कलमे केली आहेत. दहशतवाद, मॉब लिंचिंग आणि राष्ट्रीय सुरक्षेला धोका करणाऱ्या गुन्ह्यात कडक शिक्षेची तरतूद केली आहे.

पोलिस, वकिलांचा अभ्यासपोलिस ठाण्यातील सर्वच कर्मचारी आणि अधिकारी गेल्या काही दिवसांपासून नवीन कायद्यांचा अभ्यास करीत आहेत. तसेच वकील मंडळीदेखील नवीन कायदे समजून घेत आहेत. १ जुलैपासून याची अंमलबजावणी होईल. तर ३० जूनपर्यंतच जुन्या कायद्यानुसार गुन्हे दाखल होतील.

कडक शिक्षेची तरतूदमॉब लिंचिंगमध्ये पाच किंवा जास्त व्यक्तींनी एकत्र येऊन हत्या केल्यास जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते. अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्यास फाशीही होऊ शकते.१ जुलैपासून कलमांमध्ये झालेला बदल (प्रमुख कलमे)भारतीय दंड विधान  - भारतीय न्याय संहिताखून ३०२  -  १०३ (१)खुनी हल्ला ३०७   -  १०९गंभीर दुखापत ३२६  - ११८ (२)मारहाण ३२३  - ११५शांतता भंग ५०४ - ३५२धमकी ५०६  - ३५१ (२) (३)विनयभंग ३५४ -  ७४चोरी ३८० - ३०५ (ए)दरोडा ३९५  - ३१० (२)विवाहितेचा छळ ४९८ (अ) - ८५बलात्कार ३७६ (१) -  ६४ (१)सरकारी कामात अडथळा ३५३ - १३२अपहरण ३६३  - १३७(२)फसवणूक ४२० - ३१८ (४)

जुन्या कायद्यात असा बदलभारतीय दंड विधान (आयपीसी)ऐवजी ‘भारतीय न्याय संहिता’ (बीएनएस), फौजदारी प्रक्रिया संहिता (सीआरपीसी)ऐवजी ‘भारतीय नागरी सुरक्षा संहिता’ (बीएनएसएस) आणि भारतीय पुरावा कायदाऐवजी ‘भारतीय साक्ष अधिनियम’ असा उल्लेख करण्यात येणार आहे.

नवीन कायद्याची माहिती व्हावी यासाठी कार्यशाळा घेतली जात आहे. जुने खटले जुन्या कायद्यानुसारच आणि नवीन खटले नवीन कायद्यानुसारच चालवले जातील. त्यामुळे दोन्ही कायद्यांचा अभ्यास आवश्यक ठरणार आहे. सरकारी वकिलांशिवाय इतर वकिलांना प्रशिक्षणाद्वारे नवीन कायद्याची माहिती दिली जाणार आहे. - ॲड. प्रमोद भोकरे, जिल्हा सरकारी वकील

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीadvocateवकिलPoliceपोलिस