शहरं
Join us  
Trending Stories
1
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
2
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
3
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
4
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
5
VIDEO: पाहावं ते नवलंच... मुलीने चक्क केली ख्रिसमस ट्री हेअरस्टाईल, नेटकऱ्यांना हसू आवरेना
6
गीझर-हीटरमुळे तुमचे वीज बिल जास्त येतंय? या स्मार्ट टिप्स वापरून पैसे वाचवा
7
IPL 2026: ऑक्शनमध्ये चेन्नईचा मोठा डाव! १४ कोटी खर्च केले, पण परफेक्ट खेळाडू निवडला, धोनीची जागा घेणार?
8
BJP Assets: 2014 पूर्वी भाजपाच्या तिजोरीत किती पैसा होता? 11 वर्षांत किती वाढला? जाणून थक्क व्हाल!
9
आत्मनिर्भर भारताच्या दिशेने मोठे पाऊल, भारतातील पहिला स्वदेशी 64- बिट मायक्रोप्रोसेसर Dhruv64 लाँच
10
तब्बल ८ कोटी २० लाखांची बोली, दिल्ली कॅपिटल्सने संघात घेतलेला अकीब नबी दार कोण?
11
बाँडी बिचवर हल्ला करणाऱ्या साजिदचं भारताशी कनेक्शन समोर, २७ वर्षांपूर्वी सोडलं होतं हैदराबाद
12
आईने पाय धरले, तर वडिलांनी गळा आवळला; निवृत्त पोलिस अधिकाऱ्याने मुलीला संपवले, कारण...
13
Foldable Smartphones: सॅमसंग गॅलेक्सी ते गुगल पिक्सेलपर्यंत, यावर्षी लॉन्च झालेले प्रीमियम फोल्डेबल स्मार्टफोन!
14
"त्याला वर्षभर संधी, मला २-३ मॅचनंतर बाहेर काढलं..."; शुबमन गिलला संघाबाहेर न केल्याचा संताप
15
धोक्याची घंटा! फोन वाजला, उचलला पण समोरुन आवाजच नाही आला; Silent Calls चा नवा स्कॅम
16
मुंबईत महायुतीची बैठक संपली; भाजपा-शिंदेसेनेचा फॉर्म्युला ठरला, शेलारांनी आकडाही सांगितला
17
18 डिसेंबरपासून 'या' वाहनांवर बंदी! PUC शिवाय पेट्रोल नाही, 7 लाखांचा दंड; दिल्ली सरकारचा निर्णय
18
IPL 2026 Auction: Mumbai Indians ने घेतला पहिला खेळाडू; Rohit Sharma ला मिळाला नवा जोडीदार
19
वयोवृद्ध जोडपं दहशतवाद्याशी भिडलं, अखेरीस एकमेकांच्या मिठीत सोडले प्राण, बोरिस आणि सोफियाची थरारक कहाणी
20
मेस्सीचा इव्हेंट फसला, स्टेडियममध्ये मोठा गोंधळ झाला होता; बंगालच्या क्रीडामंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: चांदोली धरण गळतीचे काम बंद; किती टक्के झाले काम, कधी होणार पुर्ण.. जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2024 12:11 IST

विकास शहा शिराळा : चांदोली धरणाच्या २०१४ च्या पावसाळ्यानंतरच्या अहवालातून १४३९.४८ लिटर प्रतिसेकंद गळती सुरू होती. ही गळती थांबविण्यासाठी ...

विकास शहाशिराळा : चांदोली धरणाच्या २०१४ च्या पावसाळ्यानंतरच्या अहवालातून १४३९.४८ लिटर प्रतिसेकंद गळती सुरू होती. ही गळती थांबविण्यासाठी सुरू असलेले काम पंचावन्न टक्के पूर्ण झाले असून, यामुळेही आता डावा तीर ३२७.३० व उजवा तीर ११४ अशी एकूण ४४१.३० प्रतिसेकंद गळती आहे. धरण भरल्यामुळे सध्या हे काम बंद असून पाणीपातळी कमी होईल त्याप्रमाणे उर्वरित काम जून २०२५ पर्यंत पूर्ण होणार आहे.वारणा धरणामध्ये १९८५ पासून अंशतः तर २००२ पासून पूर्ण क्षमतेने पाणीसाठा केला. १९९२ च्या पावसाळी हंगामापासून दगडी धरणातून होणाऱ्या गळतीची मोजणी करण्यात येत आहे. अधीक्षक अभियंता, धरण सुरक्षा संघटना, नाशिक यांचे २०१४ च्या पावसाळ्यानंतरच्या धरण पाहणी अहवालानुसार दगडी धरणाच्या डाव्या बाजूस ७३७.२० व उजव्या बाजूस ७०२.२८ असे एकूण १४३९.४८ लिटर प्रतिसेकंद गळती आढळून आली होती. त्यामुळे गळती प्रतिबंधक उपाययोजनेचे काम करणे आवश्यक असल्याचे नमूद केले होते. मार्च २०१९ मध्ये अणू घनता नोंद व भूकंपीय टोमोग्राफीबाबतच्या अभ्यासाच्या अनुषंगाने धरण गळती प्रतिबंधक योजनेच्या अंदाजपत्रकीय किंमत ५०.०१ कोटी रुपये होती. यास दि. २७ जानेवारी २०२२ रोजी प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली. या कामास वर्ष २०२४-२५ साठी ३० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. यापैकी आजअखेर ५५ टक्के काम पूर्ण झाले असून, नोव्हेंबर २०२४ अखेर या कामावर ३१.३५ कोटी रुपये इतका खर्च झाला आहे. गळती रोखण्याचे काम जून २०२५ अखेर पूर्ण करण्याचे नियोजन आहे.

वारणा दगडी धरण गळती प्रतिबंधक उपाययोजना करण्याचे काम प्रगतिपथावर असून, सद्य:स्थितीत सदरचे काम भौतिकदृष्ट्या ५५ टक्के इतके पूर्ण झाले आहे. या धरणातून सिंचनासाठी नियमित पाणी लाभधारक शेतकरी यांच्या शेतीसाठी सोडले जाते. त्यामुळे धरणातील पाणीपातळी जशी जशी कमी होईल त्याप्रमाणे उर्वरित कामे जून २०२५ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. - डी. डी. शिंदे, कार्यकारी अभियंता, वारणा कालवे विभाग, इस्लामपूर.

टॅग्स :SangliसांगलीDamधरण