शहरं
Join us  
Trending Stories
1
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
2
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
3
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
4
काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण
5
VIDEO: ऑलिम्पिक पदकविजेती मनु भाकरने व्हायोलिनवर वाजवलं भारताचं राष्ट्रगीत, होतंय कौतुक
6
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
7
एकमेव भारतीय क्रिकेटपटू ज्याने १५ ऑगस्ट रोजी ठोकलंय शतक, कोण आहे तो?
8
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
9
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
10
"राष्ट्रगीत सुरू असताना असं उभं राहतात का?", स्वातंत्र्यदिन साजरा करताना शिल्पा शेट्टीच्या बहिणीकडून मोठी चूक, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
11
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
12
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
13
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
14
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS
15
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
16
बाबो! क्रिती सनॉनने मुंबईत खरेदी केलं पेंटहाऊस, किंमत ऐकून पायाखालची जमीनच सरकेल
17
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
18
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
19
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
20
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य

Sangli: चांदोली धरण परिसरात अतिवृष्टी; धरणात किती टीएमसी पाणीसाठा.. जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2025 17:12 IST

शिराळा : शिराळा शहरासह तालुक्यात पावसाने पुन्हा जोर धरला आहे. चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात तसेच धरण परिसरात अतिवृष्टी सुरू ...

शिराळा : शिराळा शहरासह तालुक्यात पावसाने पुन्हा जोर धरला आहे. चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात तसेच धरण परिसरात अतिवृष्टी सुरू असल्याने चांदोली धरण ६६ टक्के भरले आहे. या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गतवर्षीपेक्षा दुप्पट पाऊस झाला आहे. तालुक्यातील सहा मोठे प्रकल्प तसेच सर्व ४९ पाझर तलाव भरले आहेत. कोकरुड - रेठरे बंधारा पाण्याखाली गेले आहेत.चांदोली धरण पाणलोट क्षेत्रातील पाथरपुंज, निवळे येथे अतिवृष्टीची नोंद झाली आहे. यावर्षी पाथरपुंजबरोबर निवळे येथे पावसाचे प्रमाण वाढले आहे. तसेच अकरा वेळा अतिवृष्टी झाली आहे. पावसामुळे वाकुर्डे बुद्रुक येथील करमजाई तलाव, अंत्री बुद्रुक तलाव, रेठरे धरण, मोरणा धरण, टाकवे तलाव, शिवणी तलाव तसेच सर्व ४९ पाझर तलाव भरले आहेत. गिरजवडे धरणातून पाणी सोडण्यात येत असल्याने पाणीसाठा स्थिर आहे. सततच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात पेरण्या खोळंबल्या आहेत. सागाव येथील वारणा नदीचे पाणी पात्राबाहेर आले असून, स्मशान भूमी पाण्याखाली आहे.चांदोली धरण पाणलोट क्षेत्रातील निवळे, पाथरपुंज, धनगरवाडा, चांदोली येथे दमदार पाऊस सुरू असल्याने पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. गतवर्षी १०.९० टीएमसी पाणीसाठा होता. यावर्षी २२.६९ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. चांदोली धरणात ६ हजार ५२३ क्युसेकने आवक, तर वीजनिर्मिती केंद्रातून १७३५ क्यूसेकने नदीपात्रात विसर्ग सुरू आहे. नदीचे पाणी पात्राबाहेर पडले आहे. दि. २३ मेपासून आजअखेर १२.२५ टीएमसी पाणीसाठ्यात वाढ झाली आहे.

मंडलनिहाय पडलेला पाऊस कंसात एकूण पाऊस मिलिमीटरमध्ये असा..

  • कोकरूड ८.५०(४८६.९० )
  • शिराळा ०(२४३.४०)
  • शिरशी ४.३० (३६८.९०)
  • मांगले ३ (२३६.२० )
  • सागाव ३.८० (२५४.२०)
  • चरण २४.००(७०९.६० )
  • वारणावती - ३९ (८८४)

चांदोली धरण पाणलोट क्षेत्रातील पाऊस -

  • पाथरपुंज - ८३(१६३२)
  • निवळे - ६५ (१५४६)
  • धनगरवाडा - ५० (९११)
  • चांदोली - ३२ (९०१)

गतवर्षी २७ जूनअखेरचा एकूण पाऊस

  • चांदोली धरण - ३५६
  • पाथरपुंज - ८७७
  • निवळे - ६२८
  • धनगरवाडा -३६१