शहरं
Join us  
Trending Stories
1
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
2
पाकिस्तानने अमेरिकेसमोर TRF'वर सूर बदलला! म्हणाले, आम्हाला काही हरकत नाही', हुशारीही दाखवली
3
अल्पवयीन मुलीवर गँगरेप, प्रेग्नेंट असल्याचं कळताच जिवंत गाडण्याचा प्रयत्न; २ अटक तर १ आरोपी फरार
4
₹३० वरुन ₹३००० पार गेला हा शेअर; आता कंपनीनं मोठ्या गुंतवणूकीची केली घोषणा, तुमच्याकडे आहे का?
5
बनावट राजदूत मोठा मासा निघाला! दहा वर्षात १६२ वेळा परदेशात गेला, या मुस्लिम देशात बऱ्याच वेळा गेला
6
ना नुकसानीची भीती, ना पैसे बुडण्याची चिंता; 'या' स्कीममध्ये ₹१ लाख गुंतवून बनवू शकता २७ लाख रुपये
7
पीएम मोदींच्या स्वागतास अख्खे मंत्रिमंडळच आले; भारत मालदीवला 'इतके' कर्ज देणार
8
Video: गुगल मॅपच्या नादात बेलापूर येथे कार पडली खाडीत; सागरी पोलिसांच्या सतर्कतेमुळे महिलेला जीवदान
9
"मेरे को बहुत तकलीफ दिया...", सोलापूरच्या युवकाची अखेरची चिठ्ठी; मृत्यूनंतर वेगळीच शंका
10
आजचे राशीभविष्य २६ जुलै २०२५: 'या' ३ राशीच्या लोकांसाठी लाभाचा दिवस, अपूर्ण कामे पूर्ण होतील
11
"म्हातारी झालीस, लग्न कधी करणार?"; चाहत्याने केली कमेंट, ३८ वर्षीय अभिनेत्री म्हणाली-
12
कारगिल विजयदिन : वयाच्या विसाव्या वर्षी पती शहीद, आता मुलगाही देशसेवेसाठी झाला सज्ज
13
बापरे! १४,२९८ पुरुषांना ‘लाडकी बहीण’चा लाभ! डल्ला मारला कसा?
14
केवळ ‘आय लव्ह यू’ म्हणणे हा लैंगिक छळ नाही; छत्तीसगड उच्च न्यायालयाचा निकाल
15
राज्यात ८०० कोटींचा रुग्णवाहिका घोटाळा, निधी गेला श्रीकांत शिंदेंच्या ट्रस्टकडे : खा. राऊत 
16
डॉक्टरांनी रुग्णाला उंदीर अन् एटीएम समजून वागवले, डॉक्टरवरील गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार
17
महाराष्ट्रात ‘पीएम-किसान’ लाभार्थी संख्येत चौपट वाढ! शेतकऱ्यांच्या खात्यात किती
18
संपादकीय : करार ब्रिटनशी, संदेश अमेरिकेला: भारताच्या परराष्ट्र धोरणाची नवी दिशा!
19
माणिकराव कोकाटेंची गच्छंती की खातेबदल? पक्षात खल सुरू
20
मनसेचा प्लॅन तयार? रिक्त पदांवर तरुणांना संधी देणार

चिंताजनक! सांगलीतील चांदोली धरणामध्ये २१ दिवसांत ३ टीएमसीने घट, २० तलाव कोरडेठाक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2025 16:57 IST

विकास शहा शिराळा : चांदोली (ता. शिराळा) धरणातून वीजनिर्मितीसाठी तसेच शेतीसाठी पाणी सोडल्याने पाणीसाठ्यात घट झाली आहे. तीव्र उन्हामुळे ...

विकास शहाशिराळा : चांदोली (ता. शिराळा) धरणातून वीजनिर्मितीसाठी तसेच शेतीसाठी पाणी सोडल्याने पाणीसाठ्यात घट झाली आहे. तीव्र उन्हामुळे पाण्याचे बाष्पीभवन होत असल्याचा परिणाम पाणीसाठ्यावर झाला आहे. गेल्या साडेसहा महिन्यात १५ टीएमसी साठा कमी झाला आहे. तर गेल्या २१ दिवसांत ३ टीएमसीने घट झाली आहे. गतवर्षीपेक्षा हा साठा दोन टीएमसीने जादा आहे. तालुक्यातील ४९ पैकी २० पाझर तलाव एप्रिलमध्येच कोरडे पडले आहेत.चांदोली धरणातून वीजनिर्मिती केंद्रातून कालव्यात ३२६ क्युसेकने, तर नदीत ९८९ क्यूसेकने असा एकूण १३१५ क्यूसेकने विसर्ग सुरू आहे. चांदोली धरणाची साठवण क्षमता ३४.४० टीएमसी आहे. उपयुक्त साठा १२.४१ टीएमसी आहे. गतवर्षी एप्रिलमध्ये तो १०.३७ टीएमसी होता. म्हणजे यावर्षी २.०४ टीएमसी साठा जास्त आहे. पण बाष्पीभवन वेगाने होत असल्याने वेगाने घट होत आहे.

मोरणा धरणातून शेतीला पाणी द्यावे, तसेच औद्योगिक वसाहतीच्या पाणीपुरवठ्यात कपात करावी, अशी मागणी होत आहे. मोरणा धरणात ३५ टक्के, गिरजवडे ५२ टक्के, करमजाई ८५ टक्के, अंत्री खुर्द २७ टक्के, शिवणी २३ टक्के, टाकवे ३३ टक्के, कार्वे २५ टक्के व रेठरे धरण ३ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. पाझर तलावातील पाणीसाठा झपाट्याने कमी होत आहे. तालुक्यातील ३३० कूपनलिकांनी तळ गाठला आहे.

चांदोली धरणाची आजची स्थिती

  • क्षमता -३४.४० टीएमसी
  • आजचा पाणीसाठा - १९.२९ टीएमसी (५६.०७ टक्के)
  • उपयुक्त पाणीसाठा - १२.४१ टीएमसी (४५.०७ टक्के)
  • गत हंगामातील एकूण पाऊस - ४००१ मिलिमीटर
  • वीजनिर्मिती केंद्रातून विसर्ग - १३१५ क्यूसेक
  • कालव्यातून विसर्ग - ३२६ क्यूसेक
  • नदीपात्रात विसर्ग - ९८९ क्यूसेक

कोरडे झालेले तलावहातेगाव (अंबाबाईवाडी), शिरसी (गिरजवडे रस्ता), शिरसी (काळे खिंड), शिरसी (कासारदरा), पाचुंब्री, करमाळे नंबर, शिवारवाडी, भैरववाडी, निगडी जुना (कासारदरा), निगडी (खोकड दरा), इंग्रूळ, पावलेवाडी क्रमांक १ आणि २, कोंडाईवाडी क्रमांक १ आणि २, धामवडे, तडवळे वडदरा, तडवळे १, भाटशिरगाव, सावंतवाडी.

तलावांच्या बुडीत व संपादित क्षेत्रात शेतकऱ्यांनी थेट पंपाद्वारे पाणीउपसा करू नये, अन्यथा कारवाई केली जाईल. - प्रवीण तेली जलसंपदा अधिकारी

टॅग्स :SangliसांगलीDamधरणWaterपाणी