चंपाबेन महाविद्यालयास क्रीडा पुरस्कार

By Admin | Updated: July 18, 2015 00:17 IST2015-07-17T22:03:06+5:302015-07-18T00:17:30+5:30

‘ओव्हरआॅल बेस्ट सीनिअर कॉलेज टीम अ‍ॅवॉर्ड’ व ‘बेस्ट स्पोर्टिंग कॉलेज अ‍ॅवॉर्ड’ प्रदान

Champaben College sports award | चंपाबेन महाविद्यालयास क्रीडा पुरस्कार

चंपाबेन महाविद्यालयास क्रीडा पुरस्कार

सांगली : श्रीमती चंपाबेन बालचंद शाह महिला महाविद्यालयास मुंबई येथील एसएनडीटी विद्यापीठाने सर्वोत्कृष्ट क्रीडा पुरस्काराने सन्मानित केले आहे. मुंबई येथे हा कार्यक्रम पार पडला. विद्यापीठ क्रीडा स्पर्धेतील उल्लेखनीय कामगिरीबद्दल चंपाबेन महाविद्यालयास ‘ओव्हरआॅल बेस्ट सीनिअर कॉलेज टीम अ‍ॅवॉर्ड’ व ‘बेस्ट स्पोर्टिंग कॉलेज अ‍ॅवॉर्ड’ प्रदान करण्यात आले. मुंबईच्या पोलीस उपनिरीक्षक दीप्ती चव्हाण यांच्याहस्ते पुरस्कार देण्यात आले. अध्यक्षस्थानी विद्यापीठाच्या क्रीडा विभागप्रमुख डॉ. लिंडा डेनिस होत्या. प्रा. दीपक राऊत, राष्ट्रीय खेळाडू पूजा पाटील व प्रतीक्षा बावडेकर यांनाही स्पोर्टस् टॅलेंट अ‍ॅवॉर्डने गौरविण्यात आले.
महाविद्यालयास पुरस्कार मिळाल्याबद्दल गुजराती सेवा समाजाचे अध्यक्ष अरुण शेठ यांनी अभिनंदन केले. यावेळी उपाध्यक्ष शरद शाह, प्राचार्य डॉ. पी. आर. पवार, भावेश मजेठीया, रणजित पारेख, मुकेश पटेल, मनीष कोठारी, रमणिक दावडा, दीपक शाह आदी उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: Champaben College sports award

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.