शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपासोबत युती तुटताच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या हालचालींना वेग; बैठका सुरू
2
विश्वचषक विजेत्या श्रीलंकन कर्णधाराला अटक होणार; अर्जुन रणतुंगा पेट्रोलियम घोटाळ्याप्रकरणी अडचणीत
3
SBI मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८३,६५२ चं फिक्स व्याज; पटापट चेक करा स्कीमचे डिटेल्स
4
Yamuna Expressway Accident: ७ बस, ३ कारचा थरकाप उडवणारा अपघात! चार प्रवाशांचा जळून मृत्यू
5
Stock Market Today: शेअर बाजाराच्या कामकाजाची मोठ्या घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स ३०० तर निफ्टी १०० अंकांनी घसरला
6
महायुती तुटली! पुण्यात भाजपा-NCP वेगळे लढणार; अजित पवार म्हणाले, "मी माझं सर्वस्व..."
7
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
8
Plane Crash Mexico Video: इमर्जन्सी लँडिंगआधीच विमान कोसळले; भयंकर अपघातात १० जण ठार
9
TV खरेदीचा विचार करत असाल तर आत्ताच करा, जानेवारीपासून किंमत वाढवण्याची तयारी; कारण काय?
10
आचारसंहिता लागण्यापूर्वी सत्ताधाऱ्यांची धावपळ; प्रकल्पाची उद्घाटने, भूमिपूजन अन् घोषणांचा सपाटा
11
धनुर्मासारंभ: ९ राशींना शुभ काळ, सूर्यकृपेने दुप्पट लाभ; पद-पैसा वाढ, धनुसंक्रांती ठरेल खास!
12
आजचे राशीभविष्य, १६ डिसेंबर २०२५: सरकारी कामात यश, अचानक धनलाभ; सुखाचा दिवस
13
कोट-पँट घालून फिरलात तर अटक अटळ! शिक्षा लेखी नाही, पण चाबकाचे फटकारे अन्...
14
पाकिस्तानमध्ये शिजला पहलगाम हल्ल्याचा कट, सहा जणांविरोधात १,५९७ पानांचे आरोपपत्र!
15
क्रिकेटवेड्या देशाने मेस्सीवर जीव टाकला... पुढे? भारतीय फुटबॉलच्या विकासासाठी काय?
16
इंडिगो गोंधळाबाबतच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्याचे आदेश
17
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
18
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
19
संपादकीय : यत्र, तत्र, पाकिस्तान सर्वत्र! ऑस्ट्रेलियातील हल्ल्याचे पाकिस्तानी कनेक्शन
20
शत्रूला दिसणारच नाही भारताचे लढाऊ विमान, जळगावच्या बहिणाबाई विद्यापीठाचे संशोधन
Daily Top 2Weekly Top 5

चोरट्यांचे धाडस वाढले; सांगली जिल्ह्यात भिंतीला भगदाड पाडून चोरी करणारी टोळी, पोलिसांसमोर आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2025 17:29 IST

भिंत चक्क ‘ब्रेकर’ने फोडून चोरट्यांनी सोन्या, चांदीचे दागिने लंपास केले

सांगली : दरवाजाचा कडी-कोयंडा किंवा शटर उचकटून चोरी न करता थेट भिंतीला भगदाड पाडून चोरी करण्याची नवी ‘मोडस’ पोलिसांना डोकेदुखी ठरत आहेत. त्याचबरोबर चोरी झाल्यानंतर संबंधित मालकाला मोठा फटका बसत आहे. गेल्या काही वर्षांत चक्क भिंतीला भगदाड पाडून चोरी करणाऱ्या टोळ्यांनी पोलिसांसमोर आव्हान उभे केले आहे.आतापर्यंत दुकानाचे शटर उचकटून किंवा घर, फ्लॅट, बंगले यांचे कडी-कोयंडे तोडून चोरटे चोरी करत होते. परंतु, आता धाडसी चोरी करण्याची पद्धत देखील चोरटे वापरत आहेत. ताकारी (ता. वाळवा) येथील महालक्ष्मी ज्वेलर्स या दुकानाची मागील बाजूची भिंत चक्क ‘ब्रेकर’ने फोडून चोरट्यांनी आत प्रवेश करून ९ लाख ३४ हजारांचे सोन्या, चांदीचे दागिने लंपास केल्याचा प्रकार घडला.

सकाळी दुकान उघडल्यानंतर आतमध्ये भगदाड पडल्याचे दिसताच धक्काच बसला. तसेच, परिसरातून देखील या धाडसी चोरीबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे. तसेच ब्रेकरने भिंत फोडण्यासाठी त्यांनी शेजारच्या विद्युत पेटीला वायर जोडून वीज घेतल्याचेही स्पष्ट झाले.

पाच वर्षांपूर्वी दिघंची (ता. आटपाडी) येथील सराफी दुकानाच्या पाठीमागील भिंतीला भगदाड पाडून १८ लाखांचे दागिने चोरल्याचा प्रकार घडला होता. पुन्हा एकदा असाच प्रकार घडल्यामुळे सराफ दुकानदारांमध्ये भीतीचे वातावरण आहे. सांगलीत काही दिवसांपूर्वी मोबाइल शॉपीला पाठीमागून भगदाड पाडून आतमध्ये प्रवेश करून लाखो रुपयांचे मोबाइल चोरून नेल्याचा प्रकार घडला होता. तसेच, भिंतीला भगदाड पाडून चोरीचाही प्रकार सांगली परिसरात घडला.दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून आत प्रवेश करण्यापेक्षा चक्क भिंतीला भगदाड पाडून चोरी करणाऱ्यांनी पोलिसांसमोर आव्हान उभे केले आहे. अलीकडे बरेचजण चोरी होऊ नये म्हणून दरवाजाला सेंटर लॉक, मजबूत कडी-कोयंडे बसवत आहेत. परंतु, चोरट्यांनी थेट भिंतीला भगदाड पाडून चोरी केल्यामुळे आणखी कोणती सुरक्षा यंत्रणा बसवायची, असा प्रश्न निर्माण झाला आहे.चोरट्यांचे धाडस वाढलेअलीकडे मजबूत कडी-कोयंडे, सेंटर लॉक तोडूनही चोरटे चोरी करत असल्यामुळे मौल्यवान वस्तूंची सुरक्षा कशी करायची? असा प्रश्न निर्माण झाला आहे. आता थेट ब्रेकरने भिंतीला भगदाड पाडून चोरी केली जात असल्यामुळे चोरट्यांचे धाडस वाढल्याचे दिसून येत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Sangli: Bold thieves breach walls, challenge police with daring heists.

Web Summary : Thieves in Sangli are now breaking through walls to commit robberies, challenging local police. Recent incidents include a jewelry store theft of ₹9.34 lakhs and mobile shop heists, raising concerns among shop owners about security.