शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुर-मुंबई 'वंदे भारत एक्स्प्रेस' सुरू होणार, प्रवाशांचा वेळ वाचणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2023 15:57 IST

मिरज, सांगलीतील प्रवाशांचीही सोय होणार

मिरज : मुंबई ते कोल्हापूर या दोन शहरांदरम्यान राज्यातील पाचवी वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करण्यात येणार आहे. येत्या दोन महिन्यांत ही वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करण्याची मध्य रेल्वेची तयारी सुरू आहे.छत्रपती शिवाजी टर्मिनस मुंबई ते कोल्हापुरातील छत्रपती शाहू महाराज टर्मिनस दरम्यान ५१८ किलाेमीटर अंतर जलद पार करण्यासाठी वंदे भारत एक्स्प्रेसला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा आहे. ही वंदे भारत एक्स्प्रेस मुंबई ते कोल्हापूर दरम्यान दादर, ठाणे, कल्याण, पुणे, सातारा व मिरज जंक्शन स्थानकात थांबेल. सध्या मुंबई व कोल्हापूर दरम्यान महालक्ष्मी व कोयना एक्स्प्रेस या दोन गाड्यांना हा प्रवास पूर्ण करण्यासाठी ११ ते १२ तास लागतात. मुंबई ते कोल्हापूर दरम्यान वंदे भारतला केवळ सात तास लागणार असल्याने या दोन शहरात प्रवासाचा वेळ ४ ते ५ तासांनी कमी होणार आहे. पुणे-मिरज रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणाचे काम सुरू आहे. हे काम यावर्षी वेळेत पूर्ण झाले नसल्याने पुढील वर्षी मार्चपर्यत पूर्ण होण्याची शक्यता आहे. दुहेरीकरण पूर्ण होईपर्यंत या मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करण्यास अडचण असल्याने ही एक्स्प्रेस अद्याप सुरू झालेली नाही. मात्र, आता दोन महिन्यांत वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करण्याची रेल्वेची तयारी सुरू आहे. यामुळे वंदे भारत एक्स्प्रेस यावर्षी नोव्हेंबरमध्ये सुरू होण्याची शक्यता आहे. या एक्स्प्रेसमुळे मिरज, सांगलीतील प्रवाशांचीही सोय होणार आहे.

टॅग्स :Sangliसांगलीkolhapurकोल्हापूरVande Bharat Expressवंदे भारत एक्सप्रेसrailwayरेल्वे