शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

सांगलीत चार उन्हाळी विशेष एक्स्प्रेसना थांबा, प्रवाशांना दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2025 17:17 IST

नागरिक जागृती मंचच्या मागणी दखल

सांगली : जिल्हा नागरिक जागृती मंचच्या मागणीचे दखल घेत मध्य रेल्वेने ऋषिकेश, हरिद्वार, प्रयागराज, जबलपूर, मुगलसराय, पटना, दिल्ली, मथुरा, जाण्यासाठी व परत येण्यासाठी चार उन्हाळी विषेश रेल्वे गाड्यांना सांगलीचा थांबा मंजूर केला आहे.सांगली स्थानकासाठी येणाऱ्या-जाणाऱ्या प्रत्येक गाडीत प्रत्येक फेरीसाठी सहाशेपेक्षा जास्त तिकिटांची भरीव उपलब्धता सांगली जिल्ह्यातील प्रवाशांसाठी झाली आहे. मध्य रेल्वेने हुबळी-ऋषिकेश एक्स्प्रेसला गाडी व बिहार जाणाऱ्या हुबळी-प्रयागराज-मुझफरपूर एक्स्प्रेस या दोन गाड्यांना व परतीच्या दोन गाड्यांना सांगली स्टेशनवर थांबा मंजूर केला आहे.

हुबळी-मुजफ्फरपूर एक्स्प्रेस (गाडी क्र. ०७१५), मुजफ्फरपूर ते हुबळी (गाडी क्र. ०७१६), हुबळी-ऋषिकेश एक्स्प्रेस (गाडी क्र. ०६२२५), ऋषिकेश ते हुबळी (गाडी क्र. ०६२२६) अशा गाड्यांची उपलब्धता येथील प्रवाशांसाठी झाली आहे. हुबळी-ऋषिकेश एक्स्प्रेसमुळे कोल्हापूर, सांगली, इचलकरंजी, विटा, तासगाव, आष्टा, इस्लामपूर येथील प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.हुबळी-ऋषिकेश एक्स्प्रेसमध्ये स्लीपर क्लासची ५००, तर एसी स्लीपर क्लासची १०० अशी एकूण ६०० तिकिटांची उपब्लधता आहे. प्रवाशांनी आताच तिकिटांचे ऑनलाइन बुकिंग करावे, असे आवाहन रेल्वे डेव्हलपमेंट ग्रुप व नागरिक जागृती मंचच्या वतीने करण्यात आले आहे.

हुबळी-ऋषिकेश मंगळवारी येणारहुबळी-हरिद्वार-ऋषिकेश विशेष रेल्वे गाडी सांगलीतून मंगळवारी पहाटे ३.३५ वाजता रवाना होईल. त्यानंतर सातारा, पुणे, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, खंडोबा, भोपाळ, बिना, झांसी, मथुरा, दिल्ली, निजामुद्दीन, गाझियाबाद, मिरज सिटी, खटवली, मुजफ्फरनगर, देवबंद, टपरी, रुरकी या ठिकाणाहून बुधवारी दुपारी ४.१० वाजता हरिद्वाराला जाईल. तिथून पुढे ऋषिकेशला सायंकाळी ६:४५ला पोहोचेल.

ऋषिकेशहून रविवारी सांगलीत येणारऋषिकेश-हरिद्वार-हुबळी अशा परतीच्या मार्गावर जाताना हरिद्वार रेल्वे स्टेशनवरून प्रत्येक शुक्रवारी सायंकाळी ५:५५ वाजता सुटून हरिद्वार येथे सायंकाळी ६:५८ला येईल. तिथून पुन्हा त्याच मार्गावरून धावत ही गाडी रविवारी सकाळी ११.२७ वाजता सांगलीत दाखल होईल.

हुबळी-मुजफ्फरपूर १० रोजी सुटणारहुबळी-प्रयागराज-मुझफ्फरपूर एक्सप्रेस सांगली स्टेशनवरून सोमवारी १० मार्चला रात्री साडेअकरा वाजता सुटेल. सांगलीतून बसून पुणे, मनमाड, भुसावळ, ईटारसी, जबलपूर,(पचमढी), कटनी, सतना, प्रयागराज, पाटलीपुत्र (पटना), मुगलसराय जाता येईल

टॅग्स :Sangliसांगलीrailwayरेल्वे