सांगलीमध्ये आंबेडकर नगर येथे महात्मा ज्योतिबा फुले जयंती साजरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 11:26 IST2021-04-13T11:24:27+5:302021-04-13T11:26:36+5:30
MahatmaFuleJayanti Sangli : सांगली शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर येथे जय भिम मंडळातर्फे क्रांती ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. सांगली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजय सिंदकर यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

सांगलीमध्ये आंबेडकर नगर येथे महात्मा ज्योतिबा फुले जयंती साजरी
संजयनगर /सांगली : सांगली शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर येथे जय भिम मंडळातर्फे क्रांती ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. सांगली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजय सिंदकर यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी अनिल साबळे .हर्षल कांबळे,लक्ष्मण कांबळे, सचिव प्रथम कांबळे ,रोहित माने ,किरण कांबळे.अजय कांबळे, नितीन कोठावळे प्रवीण कांबळे ,सर्जेराव कांबळे संभाजी कांबळे, ज्योतीराम कांबळे आदी उपस्थित होते. त्यानंतर मंगळवारी मध्यरात्री बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीला सुरुवात करण्यात आली.
सकाळी साडेनऊ वाजता पंचशील ध्वजारोहण व प्रतिमेचे पूजन होणार आहे, त्यानंतर पुष्पहार अर्पण करून बुद्ध वंदना करण्यात येणार आहे. शासनाच्या आदेशाचे काटेकोर पालन करून जयंती साजरी करण्यात येणार आहे. नागरिकांनी बाबासाहेब आंबेडकर जयंती आपापल्या घरीच उत्सव साजरे करावेत असे आवाहन जय-भीम मंडळाच्या वतीने करण्यात आले.