वाळवा तालुक्यातील ११२ नेत्र रुग्णांवर मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:26 IST2021-03-18T04:26:09+5:302021-03-18T04:26:09+5:30
जयंत दारिद्र्य निर्मूलन व मिरज येथील लायन्स नॅब नेत्र रुग्णालयाच्या माध्यमातून मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यासाठी रवाना होत असलेले नेत्र ...

वाळवा तालुक्यातील ११२ नेत्र रुग्णांवर मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया
जयंत दारिद्र्य निर्मूलन व मिरज येथील लायन्स नॅब नेत्र रुग्णालयाच्या माध्यमातून मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यासाठी रवाना होत असलेले नेत्र रुग्ण.
लोकमत न्यूज नेटवर्क :
इस्लामपूर : जयंत दारिद्र्य निर्मूलन अभियान व मिरज येथील लायन्स नॅब नेत्र रुग्णालयाने ११२ नेत्र रुग्णांच्या मोफत मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया केल्या आहेत. वाळवा तालुक्यातील या नेत्र रुग्णांनी मोठे समाधान व्यक्त केले.
जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या वाढदिवसापासून हा सामाजिक उपक्रम सुरू आहे. वाळवा तालुक्यातील गावोगावच्या नेत्र रुग्णांना अभियानाच्या वाहनाने मिरजेला नेले जात होते. तिथे मोतीबिंदूची शस्त्रक्रिया टप्पाटप्प्याने करण्यात आल्या. लायन्स नॅब नेत्र रुग्णालयाचे डॉ. वंजारी, डॉ. थॉमस, निखिल बुजुगडे यांनी हा सामाजिक उपक्रम यशस्वी करण्यात मोलाचे योगदान केले.
प्रा. श्यामराव पाटील, विजयराव पाटील, बाळासाहेब पाटील, संजय पाटील, शहाजी पाटील, नगराध्यक्षा स्नेहल माळी, विराज शिंदे, संग्राम फडतरे, इलियास पिरजादे, राजाराम जाधव, विनायक मुळीक, विनायक जगताप, प्रसाद शेळके यांनी हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम केले.