शहरं
Join us  
Trending Stories
1
पात्र, अपात्र धारावीकरांना धारावीतच घर; पंतप्रधान मोदींच्या हस्ते भूमिपूजन होणार: मुख्यमंत्री फडणवीस
2
"बीस साल बाद एकत्र आलेले विकासात खोडा घालत आहेत"; एकनाथ शिंदेंचा विरोधकांना टोला
3
दाढीवाले जातीय तेढ निर्माण करून मागतात मते; सरकार नसून तमासगीर झालंय: हर्षवर्धन सपकाळ
4
'अहमदाबादचे नामांतर करण्याची हिंमत दाखवा'; अमित शाहांचा उल्लेख करत उद्धव ठाकरेंचे आव्हान
5
...तर अजित पवारांची माफी मागा; उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना टोला
6
Rishabh Pant Has Been Ruled Out : रिषभ पंतची न्यूझीलंड विरुद्धच्या वनडे मालिकेतून माघार; कारण...
7
'ठाकरे ब्रँड'चा फायदा उद्धव-राजना होणार? मराठी मतं 'गेम' फिरवणार? सर्व्हेची टक्केवारी समोर
8
WPL 2026 : हरमनप्रीतच्या MI चा विजयी कल्ला! DC ची कॅप्टन जेमिमावर आली स्मृतीसारखी वेळ
9
"उत्तर भारतीयांकडे वाकड्या नजरेने कुणी पाहिले तर..."; भाजपा मंत्री नितेश राणे काय बोलून गेले?
10
शिंदेसेनेला मतदान करा, जैन व्यापाऱ्याच्या मुलाची पोस्ट; भाजपा उमेदवाराच्या पत्नीने दिली धमकी
11
'गणेश नाईक यांची मनस्थिती बिघडली, त्यांना मानसोपचारतज्ज्ञाकडे घेऊन जा', शिंदेसेनेची बोचरी टीका
12
बांगलादेशला लागणार जॅकपॉट! ५०० टक्के टॅरिफच्या टांगत्या तलवारीनं का वाढली भारताची डोकेदुखी?
13
राम मंदिराजवळ नमाज पढणारा अब्दुल अहद शेख कोण? बॅगेत सापडलं असं काही, कुटुंबीय म्हणाले...  
14
PCMC Election 2026: निवडणुका जवळ आल्या की, अनेकांचा कंठ फुटून काहीही बोलतात, दादा आपण रागवायचं नाही - देवेंद्र फडणवीस
15
सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी मुंबईहून पालघरला आले, पोहायला पाण्यात उतरले आणि एकावर मृत्युने घातली झडप
16
ठाकरे बंधूंच्या 'शिवगर्जनेची' तारीख ठरली! शिवाजी पार्कवर राज ठाकरे कोणता गौप्यस्फोट करणार?
17
शरद पवार अन् अजित पवार एकत्र येणार नाहीत?; प्रफुल पटेल यांच्या विधानानं नव्या चर्चांना उधाण
18
WPL 2026 : अनुष्का शर्माचा ‘पायगुण’! GG ची ‘साडेसाती’ संपली; UP वॉरियर्सकडून ‘ती’ एकटीच लढली
19
मोदी सरकारविरोधात लिखाण करणाऱ्या डॉ. संग्राम पाटील यांना मुंबईत येताच पोलिसांनी घेतलं ताब्यात
20
Holiday for Election: मतदानासाठी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सार्वजनिक सुट्टी जाहीर, कोणाला लागू असणार?
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: मिरजेत हुल्लडबाजी करणाऱ्या दीडशे जणांवर गुन्हे; १३ जण ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2025 19:45 IST

विशेष पोलिस महानिरीक्षक सुधीर हिरेमठ यांची मिरजेस भेट

मिरज : धार्मिक भावना दुखावणारे वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ मंगळवारी रात्री मिरजेत संतप्त जमावाने दगडफेक केली. या घटनेत पोलिसांनी हुल्लडबाजी व दगडफेक करणाऱ्या सुमारे दीडशे जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले असून १३ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. विशेष पोलिस महानिरीक्षक सुधीर हिरेमठ यांनी मिरजेस भेट दिली. सुधीर हिरेमठ यांनी शांतता भंग करणाऱ्या समाजकंटकांवर कठोर कारवाईच्या सूचना दिल्या. हा प्रकार घडला त्या शास्त्री चौकात त्यांनी पाहणी केली. पोलीस आणि शहरातील प्रमुख मार्गावरून संचलन केले.मिरज येथील नदीवेस परिसरातील कोळी गल्लीत दोन तरुणांत झालेल्या वादातून धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप झाल्याने दुसऱ्या गटाने संबंधित तरुणास मारहाण केली. त्यानंतर संतप्त जमाव शहर पोलिस ठाण्यात जमा झाला. पोलिसांनी संबंधित तरुणाला ताब्यात घेऊन कारवाई केली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला. याप्रकरणी धार्मिक भावना दुखावल्याबद्दल एका व्यक्तीविरुद्ध, तर जमावबंदी आदेशाचा भंग व दगडफेक केल्याबद्दल दुसऱ्या गटातील दीडशे जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. यापैकी ३५ जणांची ओळख पटली असून १३ जणांना ताब्यात घेतले आहे.संवेदनशील भागांत पोलिस बंदोबस्तबुधवारी शहरात तणावपूर्ण शांतता होती. पोलिस अधीक्षक संदीप घुगे व वरिष्ठ अधिकारी दिवसभर मिरजेत ठाण मांडून होते., कोल्हापूर विभागाचे प्रभारी विशेष पोलिस महानिरीक्षक सुधीर हिरेमठ यांनी मिरजेस भेट देऊन प्रकरणाची माहिती घेतली. पोलिस अधिकाऱ्यांची बैठक घेऊन आवश्यक सूचना दिल्या. शहरातील संवेदनशील भागांत मोठा पोलिस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला आहे.पोलिस अधीक्षक मिरजेत तळ ठोकूनपोलिस अधीक्षक संदीप घुगे बुधवारी मिरजेत तळ ठोकून होते. शहरात प्रमुख मार्गावर संचालनात ते सहभागी होते. त्यांनी मिरजेत दगडफेक झाली नाही, कोणीही पोस्टर फाडले नाही, जमावाचा धक्का लागुन पोस्टर फाटल्याचे. सांगितले.दगडफेक झाली असेल तर संबंधितावर कारवाई होईल. दगडफेकीबाबत कोणाची तक्रार असेल तर त्यांनी तक्रार द्यावी, असे आवाहन अधीक्षक घुगे यांनी केले

English
हिंदी सारांश
Web Title : Sangli: Police file cases against 150 rioters in Miraj

Web Summary : Following stone-pelting in Miraj over alleged religious remarks, police filed cases against 150 people and detained 13. Senior officers visited, urging strict action against disruptors. The situation is tense, with heavy police presence.