शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

लाच दिल्याप्रकरणी शिक्षकास सक्तमजुरी : सांगली-आटपाडीतील प्रकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2018 22:46 IST

सांगली : मुख्याध्यापक पदावर नियुक्ती करण्यासाठी आटपाडी येथील भवानी एज्युकेशन सोसायटी या शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रावसाहेब पाटील यांना पन्नास हजाराची लाच दिल्याप्रकरणी याच शिक्षण संस्थेतील सहाय्यक

ठळक मुद्देसंस्थेच्या अध्यक्षालाच दिली पन्नास हजाराची लाच

सांगली : मुख्याध्यापक पदावर नियुक्ती करण्यासाठी आटपाडी येथील भवानी एज्युकेशन सोसायटी या शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रावसाहेब पाटील यांना पन्नास हजाराची लाच दिल्याप्रकरणी याच शिक्षण संस्थेतील सहाय्यक शिक्षक दगडू निवृत्ती कुंभार (वय ५३, रा. आटपाडी) यास दोषी धरुन एक वर्ष सक्तमजुरी व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली. जिल्हा व सत्रन्यायाधीश जी. ए. रामटेके यांनी सोमवारी हा निकाल दिला.भवानी एज्युकेशन सोसायटीच्या शिक्षण संस्थेतील एक मुख्याध्यापक सेवानिवृत्त होणार होते. सेवाज्येष्ठतेनुसार त्यांच्या जागेवर नवीन मुख्याध्यापकाची नियुक्ती करण्यासाठी रावसाहेब पाटील यांनी संस्थेतील तीन सहाय्यक शिक्षकांना मुलाखतीस बोलाविले होते. यामध्ये दगडू कुंभार यांचाही समावेश होता. मुलाखती घेतल्यानंतर संस्थेने संचालक मंडळाची बैठक बोलाविली. या बैठकीत शिक्षक पिंजारी यांची मुख्याध्यापकपदी तात्पुरती नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसा ठरावही करण्यात आला होता. त्यानंतर कुंभारने पाटील यांची भेट घेऊन, ‘पिंजारी यांची नियुक्ती रद्द करुन त्यांच्या जागी माझी मुख्याध्यापकपदी नियुक्ती करा, यासाठी मी तुम्हाला एक लाख रुपये देतो,’ असे सांगितले. पण पाटील यांनी त्यास नकार दिला. तरीही कुंभारने त्यांना, ‘आता तुम्हाला पन्नास हजार रुपये देतो व नियुक्ती केल्यानंतर उर्वरित पन्नास हजार रुपये देईन’, असे सांगितले. पण पाटील यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केले.मुख्याध्यापक पदावर विराजमान होण्यासाठी कुंभार हा पाटील यांच्या एकसारखा मागेच लागून राहिला. त्यामुळे पाटील यांनी कुंभार लाच देत असल्याची तक्रार सांगलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागात दाखल केली होती. या विभागातील पथकाने तक्रारीची चौकशी केली असता, यामध्ये कुंभार लाच देणार असल्याचे स्पष्ट झाले. पथकाने रचलेल्या सापळ्याप्रमाणे पाटील यांनी कुंभारला लाचेची रक्कम घेऊन येण्यास सांगितले. तेव्हा कुंभारने त्यांना २१ जून २०१२ रोजी सिद्धेवाडी (ता. मिरज) येथे बोलावून घेतले. तत्पूर्वी लाचलुचपत प्रतिबंधकचे पथक वेशांतर करुन थांबले होते. कुंभार याने पाटील यांना पन्नास हजाराची लाच दिल्यानंतर कुंभारला रंगेहात पकडण्यात आले. त्याच्याविरुद्ध मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.सरकारतर्फे या खटल्यात जिल्हा सरकारी वकील उल्हास चिप्रे यांनी काम पाहिले. चिप्रे यांनी सरकारतर्फे चार व बचाव पक्षातर्फे एक असे पाच साक्षीदार तपासले. फिर्यादी रावसाहेब पाटील, तपास अधिकारी व पंच यांच्या साक्षी ग्राह्य मानून न्यायालयाने कुंभारला एक वर्ष सक्तमजुरी, पाच हजार रुपये दंड, दंड न भरल्यास दोन महिने साधी कैदेची शिक्षा ठोठावली आहे.पहिलाच निकाललाच देणे व घेणे हा गुन्हा आहे. लाचेची मागणी केल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रारी दाखल होण्याचे प्रमाण अधिक आहे. परंतु लाच देत आहे, अशा तक्रारी दाखल होण्याचे प्रमाण काहीच नाही. लाच घेतल्याप्रकणी आरोपींना शिक्षा झाली आहे. मात्र सांगलीत प्रथमच लाच दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला. तसेच या गुन्ह्यातील आरोपी कुंभारला शिक्षाही झाली आहे.

टॅग्स :SangliसांगलीPoliceपोलिसTeacherशिक्षक