मिरजेतील अॅपेक्स रुग्णालयप्रकरणी आणखी तीन डाॅक्टरांची चाैकशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:18 IST2021-06-21T04:18:41+5:302021-06-21T04:18:41+5:30
मिरजेतील अॅपेक्स रुग्णालयाचा संचालक डॉ. महेश जाधव यास सदोष मनुष्य वधाप्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने त्यास सात दिवस ...

मिरजेतील अॅपेक्स रुग्णालयप्रकरणी आणखी तीन डाॅक्टरांची चाैकशी
मिरजेतील अॅपेक्स रुग्णालयाचा संचालक डॉ. महेश जाधव यास सदोष मनुष्य वधाप्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने त्यास सात दिवस पोलीस कोठडी दिली आहे. डाॅ. जाधव याने आर्थिक फायद्यासाठी कोविड रुग्णालय सुरू करण्यासाठी एमडी मेडिसीन डाॅक्टरांसह अन्य काही डाॅक्टरांची कागदोपत्री नियुक्ती दाखविली आहे. रुग्णांवर उपचाराबाबत या डाॅक्टरांच्या भूमिकेच्या चाैकशीसाठी संबंधित डाॅक्टरांना पोलिसांनी पाचारण केले आहे. त्यामुळे या प्रकरणाची व्याप्ती वाढण्याची शक्यता आहे. कोविड रुग्णांवरील उपचारातील गैरप्रकारांबद्दल डाॅ. जाधव याच्या रुग्णालयात वैद्यकीय कर्मचारी म्हणून काम करणाऱ्या इतर सातजणांनाही पोलिसांनी यापूर्वी अटक केली आहे. अॅपेक्स कोविड रुग्णालयातील उपचाराबाबत महापालिका आरोग्य अधिकाऱ्यांच्या तक्रारीमुळे डाॅ. जाधव याच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला आहे. अॅपेक्स कोविड रुग्णालयात आवश्यक वैद्यकीय सुविधा व तज्ज्ञ वैद्यकीय कर्मचारी नसतानाही दोन महिन्यात २०५ रुग्ण दाखल करुन घेण्यात आले. यापैकी ८९ रुग्णांच्या मृत्यूप्रकरणी सिव्हिलच्या डाॅक्टरांची समिती रुग्णांवर झालेल्या उपचारांची छाननी करीत आहे.